पीक कर्ज
पीक कर्ज
नाशिक

ई-पीक पाहणीत ३६१९ शेतकर्‍यांचा सहभाग

दिंडोरीत शासनाचा पथदर्शी प्रकल्प

Abhay Puntambekar

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

करोनाच्या पार्श्वभुमीवर यदाच्या खरीप हगामात दिंडोरी तालुक्यात ई-पीक पाहणी अ‍ॅप नोंदणीत ३६१९ शेतकर्‍यांनी सहभाग नोंदवला असुन सुमारे ४३६२ हेक्टर क्षेत्राची नोंदणी झाली असल्याची माहिती प्रांत डॉ.संदिप आहेर यांनी दिली.

ई-पीक नोंदणीत आता दिंडोरी तालूक्याने आघाडी घेतल्याचे दिसुन येत आहे. ३६१९ शेतकर्‍यांचा सहभाग ही बाब उल्लेखनिय मानली जात आहे. त्यामुळे शेतकरीही आता अ‍ॅपचा वापर करु लागल्याचे स्पष्ट होत आहे. करोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागातही होत चालला आहे. त्यामुळे शासकिय कार्यालयांप्रमारे शेतावर काम करणार्‍या महसुल आणि कृषी विभागाच्या यंत्रणेलाही शेतकर्‍यांनी ई पिक पाहणी अ‍ॅप नोंदणी दिंडोेरी तालूक्यात करावी यासाठी प्रशासनाने एक ते दोन महिन्यापासुन कंबर कसली होती.

महाराष्ट्र राज्यात ई-पीक पहाणीचा पथदर्शी प्रकल्प एकुण ९ तालूक्यात राबवण्यात येत आहे.नाशिक विभागातुन दिंडोरी तालुक्याची निवड झालेली आहे. दिंडोरी तालूक्यात हा प्रकल्प फेब्रुवारी २०१९ पासुन राबवण्यात येत आहे.तालूक्यात एकुण ६७०६४ खातेदारांपैकी ५६४२६ खातेदारांची आतापर्यत प्राथमिक नोंदणी झालेली आहे.

चालू वर्षाच्या खरीप हंगामातील पिक पहाणीला सुरुवात झालेली आहे. या वर्षीच्या संपुर्ण खरीप हंगामातील संपुर्ण पिक पाहणी ही फक्त मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातुन केली जाणार असल्याने सर्व शेतकर्‍यांनी आपल्या पिकाची नोंदणी स्वत: करणे आवश्यक आहे.चालू वर्षीची कोव्हिड स्थिती लक्षात घेता अधिकारी कर्मचारी तसेच शेतकर्‍यांना प्रशिक्षण व जनजागृती करण्यासाठी व्हीडीओ कान्फरस माध्यमांचा वापर करण्यात येत आला.

तालूक्यातील सर्व तलाठी व कृषी सहायक तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी, कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण व्हीडीओ कान्फरसच्या माध्यमातुन नुकतेच पार पडले. या प्रकल्पाचे मुख्य मार्गदर्शक जयंत कुमार बांंठीया,प्रकल्प सल्लागार संभाजी पाटील, राज्य समन्वयक इ फेर फार जमाबंदी आयुक्त रामदास जगताप यांनी मार्गदर्शन केले.दिंडोरी तालूक्याचे इ पिक पहाणीचे कामकाजाचे सुक्ष्म नियोजन करण्यासाठी मागील आठवण्यात विभागीय उपायुक्त दिलीप स्वामी, उन्मेष मंहाजन यांनी दिंडोरी तहसिल कार्यालयात सभा घेतली होती.

सभेत प्रांत संदिप आहेर, तहसिलदार कैलास पवार,जिल्हा समन्वयक बी.डी.पाटील आदी उपस्थित होेते. सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम शेतकर्‍यांपर्यत ई-पीक , नोंदणी अ‍ॅप पोहचवले. त्यामुळेच ३० जुलै २०२० अखेर दिंडोरी तालूक्यात ३६१९ शेतकर्‍यांनी ई-पीक पहाणी अ‍ॅप वापरले व ४३६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकाची नोंदणी मोबाईल अ‍ॅप मार्फत केली. आता १५ ऑगस्ट पर्यत ई-पीक पाहणी पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com