ओझे : Oze (वार्ताहर)

दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन पॅनलच्या सात ठिकाणी विजय झाला असून ग्रामविकास पॅनलला खातेही उघडता आले नाही. गेल्या ३५ वर्षापासून या गावात बिनविरोध निवडणुकीची परपंरा होती याही वेळेस गावाने बिनविरोध निवडणुक घेवून उमेदवार घोषित केले होते.

मात्र काही लोकांनी या बिनविरोध निवडणुकीवर अक्षप घेतल्यामुळे गावाला निवडणुकीत सामोरे जावे लागले मात्र पुन्हा निवडणुकीतही गावाने बिनविरोध निवडणुन दिलेल्या उमेदवारा कौल देऊन विजयी केले आहे .

कादवा माळूंगी ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड .क्र.१ मधून पंडित भिका साहाळे यांनी १९० मते मिळवून विजयी झाले आहे यांच वार्ड मधून सविता अनिल गांगोडे यांनी १९८ मते मिळवून विजय खेचून आनला तर कविता सुरेश गांगोडे यांना १९३ मते मिळाली असून त्या विजयी झाल्या आहे.

वार्ड क्रं २ मधून माधव भास्कर निकम यांना १६३ मते मिळवून विजयी झाले तर शिलाबाई भास्कर आहेर यांना१६३ मते मिळवून विजयी झाले आहे.

वार्ड क्र. ललिता यशवंत गांगोडे १८२ मते मिळवून विजयी झाले तर पंढरीनाथ रामदास गोतरणे हे बिनविरोध निवडणुन आले आहे या निवडणुकीत गावाने परिवर्तन कौल दिला आहे.