दोडी सोसायटीवर ‘परिवर्तन’; सत्ताधारी गटाला दोन जागा

दोडी सोसायटीवर ‘परिवर्तन’; सत्ताधारी गटाला दोन जागा

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

तालुक्यातील दोडी बु विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या (Executive Service Cooperative Society) निवडणूकीत (election) राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ (NCP's taluka president Balasaheb Wagh) व माजी सरपंच पी. जी. आव्हाड यांच्या परीवर्तन पॅनलने 11 जागांवर विजय मिळवत सत्ताधारी गटाच्या हातातून सत्ता खेचून आणत परीवर्तन घडविले आहे. ब्रम्हानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग केदार यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलला अवघ्या दोन जागावर समाधान मानावे लागले.

सर्वसाधारण गटातून परिवर्तनचे अमृता कृष्णा आव्हाड (485), रघुनाथ एकनाथ आव्हाड (533), अनिल गणपत जाधव (485), गेणु वाळीबा साळे (458), वसंत कारभारी शेळके (526), मनोहर रामचंद्र वाघ (501) तर शेतकरी विकास पॅनलचे निवृत्ती म्हतारबा आव्हाड (477) व बाळु हरी दराडे (458) यांनी विजय संपादन केला. शेतकरी विकास गटाचे गोपाळ जयराम आव्हाड (431), दत्तात्रय कारभारी जाधव (424), लहानू हरी सांगळे (456), सुरेश नामदेव शिंदे (427), नामदेव कचरु शेळके (450), ज्ञानेश्वर पांडुरंग उगले (422) यांना पराभव सहन करावा लागला. परिवर्तन पॅनलचे भाऊपाटील जयराम आव्हाड (440), छगन गोविंद उगले (436) यांचाही पराभव झाला.

अनुसूचित जाती जमाती गटातून अरुण दादा भालेराव (535) विजयी झाले. त्यांनी गणेश सोनवणे (392) यांचा पराभव केला. महिला राखीव गटातून परिवर्तनच्या शकुंतला बाळासाहेब वाघ (583) व हिराबाई बाळासाहेब आव्हाड (504) यांनी विजय खेचून आणला तर शांताबाई विठ्ठल केदार (479) व सखुबाई मधुकर आव्हाड (378) यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. इतर मागासवर्गीय गटातून सूर्यभान नामदेव आव्हाड (501) यांनी एकनाथ शिवराम आव्हाड (485) यांचा पराभव केला.

भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून शिवाजी कारभारी केदार (573) यांनी शरद बारकू कांगणे (420) यांना पराभूत करत दणदणीत विजय मिळवला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी एकनाथ पाटील यांनी काम पाहिले. त्यांना संस्थेचे सचिव माधव जाधव यांनी सहाय्य केले. निकाल घोषित होताच वाघ समर्थकांनी गुलालाची उधळण करत आपला आनंद व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com