ओझर एचएईडब्ल्यू संस्थेत परिवर्तन

ओझर एचएईडब्ल्यू संस्थेत परिवर्तन

ओझर। वार्ताहर | Ozar

येथील एच.ए.एल कामगार व अधिकारी (HAL workers and officials) यांच्यासाठी असलेल्या एचएईडब्लूआरसी संस्थेच्या (HAEWRC Institute) 5 जागांसाठी झालेल्या द्विवार्षिक ऑनलाईन निवडणुकीत (Online election) संस्थेचे माजी सरचिटणीस दीपक टावरे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने सत्ताधारी जनसेवा पॅनलचा पराभव करून दणदणीत विजय मिळविला आहे.

या निवडणुकीत (election) एचएईडब्लूआरसी संस्थेच्या सरचिटणीस 1 जागा, वाचनालय सचिव 1, सांस्कृतिक सचिव 1, कामगार कल्याण विभाग सचिव 1 व शिक्षण विभाग सचिव 1 जागा अशा 5 जागांसाठी ऑनलाईन निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात (voting) संस्थेच्या 3772 मतदारांपैकी 3003 मतदारांनी मतदानाचा हक्क (Right to vote) बजावल्याने 80 टक्के मतदानाची नोंद झाली.

मतदान संपल्यानंतर लागलीच मतमोजणी (vote counting) होऊन निकाल जाहिर करण्यात आले. यात माजी सरचिटणीस दीपक टावरे (Former General Secretary Deepak Taware) यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलचे सरचिटणीस दीपक टावरे 2037 मते, वाचनालय सचिव जयंत भांबारे 1706 मते, सांस्कृतिक विभाग सचिव कुणाल खरे 1661 मते, कामगार कल्याण विभाग सचिव जीवन चौधरी (Labor Welfare Department Secretary Jeevan Chaudhary) 1890 मते,

शिक्षण विभाग सचिव सुदर्शन भालेराव (Education Department Secretary Sudarshan Bhalerao) 1503 मते मिळवून विजयी झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र बोरसे (Election Returning Officer Rajendra Borse) व सहाय्यक निवडणूक अधिकारी अनिकेत बोरकर (Assistant Election Officer Aniket Borkar) यांनी मतमोजणी संपल्यानंतर जाहिर केले.

या निवडणुकीत पराभूत झालेल्या जनसेवा पॅनलच्या उमेद्वारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : सरचिटणीस पदासाठी योगेश बागुल यांना 966 मते, वाचनालय विभाग सचिव अनुप खैरनार यांना 1297 मते, सांस्कृतिक विभाग सचिव गोपाल भगत यांना 1342 मते, कामगार कल्याण विभाग सचिव देविदास शिंदे यांना 1113 मते, शिक्षण विभाग सचिव जितेंद्र वाळुंज यांना 1500 मते मिळाली आहेत.

तब्बल सात वर्षानंतर संस्थेच्या झालेल्या या निवडणूकीचा निकाल (Election result) जाहिर होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. सर्व विजयी उमेदवारांचे कामगार व अधिकारी यांचेसह संघटना व विविध संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे. ही निवडणूक सत्ताधारी जनसेवा पॅनल तसेच विरोधकांचे परिवर्तन पॅनल यांचेसाठी प्रतिष्ठेची ठरली होती.

मात्र कामगार आणि अधिकारी यांचेबरोबर असलेले स्नेहाचे संबंध तसेच कामगारांच्या अडीअडचणी सोडविण्याचा दिलेला शब्द त्या तुलनेत सत्ताधार्‍यांबद्दल असलेली नाराजी जनसेवा पॅनलच्या उमेद्वारांना पराभवासाठी कारणीभूत ठरली. अनेक वर्षानंतर येथे परिवर्तन घडल्याने परिवर्तन पॅनलच्या विजयी उमेद्वारांसह नेत्यांकडून कामगारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. विजयी उमेद्वारांचे अभिनंदन होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com