नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

आत्तापर्यंत लहान मुलांमध्ये करोनाचे प्रमाण कमी होते, पण लहान मुलांच्या डॉक्टरांच्या निरीक्षणानुसार या वेळेस लहान मुलांमधील करोनाचे प्रमाण वाढले आहे. मुलांसाठी ही हा प्राणघातक आहे.

तेव्हा सर्वांनी लहान घरातील मुले व वृध्दांच्या जीवाच्या सरंक्षणासाठी आपली जबाबदारी लक्षात घेऊन करोना साथ आटोक्यात आणण्यासाठी सामुहिक प्रयंत्न करावेत असे आवाहन मनपाच्या घन कचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी केले आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रात येणार्या काळात करोना प्रादुर्भाव रोकण्यासाठी करावे लागणे लॉकडाउन टाळायचे असेल तर सर्वांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पाळावेत असे आवाहन आज डॉ. कुटे यांनी केले.

शासनाच्या नियमानुसार नाक आणि तोंड मास्कने व्यवस्थित झाकावे, बोलताना मास्क काढू नये किंवा खाली करू नये, गर्दीमध्ये, बंदिस्त ठिकाणी जाणे टाळावे, सोशल डिस्टंसिंग म्हणजे दोन माणसांमध्ये सहा फुटाचे अंतर राखावेत आणि करोना सारखी लक्षणे असतील तर ताबडतोब तपासणी करून घेणे, अशाप्रकारे नियमांचे पालन आवश्यक आहे.

करोनाचे लक्षणे दिसत असतांना अनेक लोक अजूनही तपासणी करायला तयार होत नाहीत. करोना झाला तर आयसोलेट व्हावे लागेल, घरी बसावं लागेल या भीतीने उशिरा तपासणी करतात आणि आजार वेगाने पसरतो. तसेच करोना झालेल्या व्यक्तींच्या घरातील इतरांनी देखील आपली तपासणी करणे. निगेटिव्ह आली तरी आठ दिवस घराबाहेर पडुन नये.

कारण करोनाची साथ ही झपाट्याने वाढत आहे. आत्ताचा करोना हा जास्त तीव्र स्वरूपाचा, लवकर पसरणारा आणि त्यामुळे मृत्यू देखील जास्त होत आहे, असे स्पष्ट झाले एाहे. कितीतरी पेशंटला ऑक्सिजन मिळत नाहीत, त्या अभावी त्यांचा मृत्यू होत आहे.

तसेच आत्तापर्यंत लहान मुलांमध्ये करोनाचे प्रमाण कमी होते पण लहान मुलांच्या डॉक्टरांच्या निरीक्षणानुसार या वेळेस लहान मुलांमधील करोनाचे प्रमाण वाढले आहे. मुलांसाठी आता करोना प्राणघातक बनला आहे.

करोनाची साथ थांबवायची जबाबदारी ही फक्त शासन, आरोग्य व वैद्यकीय विभाग कर्मचारी, डॉक्टर, पोलीस यांची नसून प्रत्येक जबाबदार नागरिकाची आहे. शहरातील सर्व नागरिक जबाबदार पणे वागले, सगळ्यांनी करोनाचे नियम पाळले तर नक्कीच करोनाची साथ लवकर आटोक्यात येईल असा विश्वास घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी व्यक्त केला आहे.