
सुरगाणा | प्रतिनिधी
सुरगाणा तालुका लोकशाहीवादी युवा महासंघ (डीवायएफआय) कमिटी व सदस्य सभासद यांच्या वतीने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची रिक्त असलेली पदे तात्काळ भरावीत यासाठी जिल्हा परिषद शाळा खोबळा व गणेशनगर येथील पालकांनी विद्यार्थ्यांसह बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे.
२६ जुन २०२३ रोजी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक,मुख्याध्यापक, पदवीधर, केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी असे निवेदन डीवायएफआय देण्यात आले होते, त्या निवेदनाचा संदर्भ घेत शिक्षणाधिकारी नाशिक यांच्याद्वारे एका महिन्यात रिक्त शिक्षक पदे भरली जातील असे लेखी आश्वासन २७ जुलै २०२३ रोजी देण्यात आले होते. अद्याप ही त्याची अंमलबजावणी झाली नाही.
शाळा सुरू होऊन चार महिने झाले परंतु अजूनही सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक भरती झाली नसल्याचे तेथे शिक्षक उपलब्ध नाहीत, तालुक्यातील गरीब, आदिवासी, बिगर आदिवासी बांधवांची हजारो मुले-मुली शिक्षणापासून वंचित आहेत, ते स्वयं शिक्षण घेऊ शकत नाहीत, तालुक्यात शिक्षक संख्या कमी असल्याने मुलांची एक पिढी बरबाद होण्याचा मार्गावर आहे.
मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आल्याने येथील विध्यार्थ्यांना न्याय्य मिळवुन देण्यासाठी डीवायएफआय संघटनेचे तालुका अध्यक्ष नितिन गावित,उपाध्यक्ष पांडुरंग गायकवाड,अशोक धुम, मोहन पवार,रोहिणी वाघेरे,चंद्रकांत वाघेरे,जगन गावीत,नितीन पवार, मेनका पवार आदी उपस्थित होते.
मा.शिक्षण आयुक्त पुणे यांच्या मार्फत पेसा क्षेत्रात शिक्षण सेवक भरती प्रक्रियेची कार्यवाही सुरू असल्याने लवकरच पेसा भरती अंतर्गत सुरगाणा तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त जागा शासन निर्देशानुसार भरण्यात येणार असल्याने आपण बेमुदत साखळी उपोषणा सारख्या मार्गाचा अवलंब करू नये." डॉ. नितीन बच्छाव शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नाशिक.
-डॉ. नितीन बच्छाव - शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद, नाशिक.
विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तालुका जिल्हा आणि राज्य प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन तालुक्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, शिक्षक त्वरित शाळेवर पाठवावे, मुलांचे तीन महिन्याचे शैक्षणिक नुकसान भरुन काढावे,अन्यथा तालुक्यातील युवक आणि तरुणांचे हे बेमुदत साखळी उपोषणाचे आंदोलन अधिक तिव्र होईल".
तुळशीराम खोटरे- प्राध्यापक