शालेय फी वसुली विरोधात पालकांचे आंदोलन

शालेय फी वसुली विरोधात पालकांचे आंदोलन

येवला । प्रतिनिधी Yevla

करोना( Corona ) संसर्गामुळे शाळा बंद असून सुद्धा केवळ ऑनलाईन पद्धतीने थातूरमातूर शिक्षण देऊन पालकांकडून मनमानी पद्धतीने पूर्ण फी ( School Fees ) वसूल करणार्‍या शाळेविरोधात पालकांनी चार तास आंदोलन ( Agitation of Parents ) केले आहे.

सक्तीचे शुल्क वसुली करून नये, यासाठी येथील डे पॉल इंग्लिश मीडियम शाळा प्रशासन विरोधात पालक सुमारे चार तास आंंदोलन करुन शिक्षण नाही तर शुल्क सुध्दा नाही,असा पवित्रा घेतला. त्यानंतर शहर पोलिस निरिक्षक संदीप कोळी यांना निवेदन देण्यात आले.

करोनाच्या सावटात अनेकांचे उत्पन्न बुडाले आहे. डीपॉल शाळा प्रशासनाने संपूर्ण शुल्क वसूलीचा तगादा सुरू केला आहे. या विरोधात सर्व पालकांनी एकजूट होऊन मंगळवार दि. 29 रोजी शाळा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन सुरू केले होते. मात्र आंदोलन करुनही शुल्क वसूलीचा तगादा सुरुच असल्याने आज पालक पुन्हा आक्रमक झाले.

यावेळी डे पॉल प्रशासनाने 20 टक्के सवलत देण्याचे देता येईल असे सांगितले. मात्र पालक 100 टक्के शुल्क माफ करावे, यासाठी आग्रही होते. शाळेच्या प्रशासनाने आंदोलन करणार्‍या पालकांकडे दूर्लक्ष केल्याने वाद वाढला होता. त्यामुळे पालकांनी ठिय्या मांडला. याप्रसंगी पालक श्याम शिंदे, नारायण गायकवाड, भाऊसाहेब बडे, योगेश शिंदे, मुश्रीफ शहा, निलेश शिंदे, गोविंद दरड आधी पालक वृंद उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com