नाशिक

शेतीमालासाठी देवळालीहून पार्सल ट्रेन

Abhay Puntambekar

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

शेतीमालासाठी मध्य रेल्वेद्वारे देवळाली ते दानापूर दरम्यान किसान विशेष पार्सल गाड़ी ७ ऑगस्टपासून सुरु करणार आहे. प्रत्येक आठवड्यात शुक्रवारी ही गाडी चालविण्यात येईल. या गाडीमध्ये फळे, भाजीपाला आणि इतर नाशवंत माल बुक करता येईल.

७ ते २८ ऑगस्टदरम्यान ही गाडी देवळालीहून ११ वाजता निघेल आणि शनिवारी दानापूरला १८.४५ वाजता पोहोचेल. नाशिकरोडहून ती ११.३० वा. प्रस्थान मनमाडहून १२.५५ वाजता तर जळगावहून १५.१५ वाजता ती निघेल.

भुसावळ, बुर्‍हाणपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, माणिकपूर, चिवकी, वाराणसी आणि बक्सर या ठिकाणीही ती थांबा घेईल. दानापूरहून ही गाडी ९ते ३० ऑगस्टपर्यंत प्रस्थान करेल. सोमवारी देवळालीला १९.४५ वाजता पोहोचल. खंडवा, बुर्‍हाणपूर, भुसावळ, जळगांव, मनमाड, नाशिकरोड येथे ती थांबेल.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com