पानीपत युध्द शौर्य व पराक्रमाची गाथा : महिंद

पानीपत युध्द शौर्य व पराक्रमाची गाथा : महिंद

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

पानीपतच्या युध्दात (Battle of Panipat) वीर मराठे (maratha) हरल्याने पानीपत हा शब्द कुचेष्टेने बोलला जात असला तरी हे युध्द कुचेष्टा नसून मराठे वीरांनी दाखविलेली शौर्यगाथा आहे. त्यामुळे या युध्दानंतर भारतावर कुणीही आक्रमण करण्याची हिंमत दाखवू शकलेला नाही.

पानीपत युध्दामागच्या भुमिकेचे प्रबोधन करण्यासाठीच पानीपत जागरण अभियान (Panipat Jagran Abhiyan) सुरू करण्यात आले असल्याची माहिती या अभियानाचे प्रमुख संदीप महिंद (Sandeep Mahind) यांनी येथे बोलतांना दिली.

पानीपत युध्दाला 261 वर्षे पुर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे ते पानीपत जागरण अभियानांतर्गत राष्ट्र समर्पण अभिवादन मोहिम (Nation Dedication Greetings Campaign) यात्रेचे शहरात आगमन झाल्यावर भाजपसह (BJP) शिवजयंती उत्सव समिती (Shiv Jayanti Utsav Samiti), मराठा महासंघ (Maratha Federation), राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (Rashtriya Swayamsevak Sangh), शिव प्रतिष्ठान (shiv pratishthan) आदी विविध संघटनांतर्फे छत्रपती शिवाजी महाराज (chatrapati shivaji maharaj) यांच्या पुतळ्याजवळ मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

या जनप्रबोधन अभियानात सहभागी झालेल्या संदीप महादेवराव महिंद, अशोक सरपाटील, संदीप बर्शीले, किशोर चौधरी, भगवान शिंदे, बापू शेलार, राजेंद्र बेंद्रे, संजय बोलींज यांचे भाजप उत्तर महाराष्ट्र व्यापारी आघाडीचे प्रमुख नितीन पोफळे, हरिप्रसाद गुप्ता, विवेक वारूळे, यशवंत खैरनार आदींनी स्वागत केले. यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

सटाणा (satana) रोडवरील नितीन पोफळे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत संदीप महिंद यांनी पानीपत जागरण अभियानाची माहिती दिली. पानीपत युध्दाला 261 वर्षे पुर्ण झाली आहेत. आजही आपले पुर्वज इतक्या थंडीत उत्तर भारतात कां गेले? असा प्रश्न महाराष्ट्रातील (maharashtra) नागरीकांना पडणे स्वाभाविक आहे. यामुळे हे युध्द कशासाठी होते व मराठे सैनिक कां लढले याविषयी प्रबोधन करण्यासाठी सदरचे अभियान राबविले जात आहे.

पानीपतच्या युध्दाने (Battle of Panipat) महाराष्ट्राने (maharashtra) देशाच्या सिमा निश्चित करण्यासाठी दाखवलेला पराक्रम आहे. हे युध्द कुचेष्टेचा नव्हे तर अभिमान बाळगावे असेच आहे. याकरिता ज्या मार्गाने मराठे सैन्य पुणे ते पानीपत येथे गेले त्याच मार्गाने जात हे जागरण अभियान राबविले आहे. पानीपत म्हणजे पराभव ही अपमानाची भावना मोडीत काढून पानीपत म्हणजे शौर्य व पराक्रमाची गाथा असल्याचे जनमाणसात बिंबवण्याचा प्रयत्न या अभियानाव्दारे केला गेल्याचे महिंद यांनी शेवटी बोलतांना सांगितले.

यावेळी ओबीसी (OBC) मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष दीपक पवार, संपर्कप्रमुख जयप्रकाश पठाडे, रामदास बोरसे, विवेक वारुळे, जितेंद्र देसले, भरत पाटील, दीपक पाटील, यशवंत खैरनार, कैलास शर्मा, दीपक गुप्ता, गणेश जंगम, विजय एथॉलं, शाम देवरे, गौतम शहा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.