४० पेक्षा अधिक नागरिकांना अचानक जुलाब आणि उलट्यांचा त्रास झाल्याने घबराट

४० पेक्षा अधिक नागरिकांना अचानक जुलाब आणि उलट्यांचा त्रास झाल्याने घबराट

इगतपुरी । प्रतिनिधी | Igatpuri

इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri taluka) तारंगण पाडा येथील ४० पेक्षा अधिक नागरिकांना जुलाब (diarrhea) आणि उलट्यांचा (vomiting) त्रास झाल्याने इगतपुरी तालुक्यातील विविध हॉस्पिटलमध्ये रुग्णांना (patients) दाखल करण्यात आले आहे.

इगतपुरी ग्रामीण रुग्णालय (Igatpuri Rural Hospital) येथे काही रुग्णांना दाखल करण्यात आले असुन काही रुग्णांना घोटी (ghoti) आणि नाशिक (nashik) येथील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या गंभीर घटनेची माहिती समजताच आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांनी तातडीने भेट देऊन तेथे घडलेल नेमका प्रकार जाणुन घेतल्यानंतर दुषित पाण्यातुन (contaminated water) हा प्रकार घडल्याचे जाणवले.

यावेळी आमदार खोसकर यांनी तातडीने आरोग्य विभाग (Department of Health), तहसील प्रशासन (Tehsil Administration), वैद्यकीय अधिकारी यांच्या टीमला घटनास्थळी पाचारण करून उपाययोजना सुरू केल्या. तारांगण पाड्यातील उर्वरित नागरिकांना वैद्यकीय सुविधा (Medical facilities) त्वरीत उपलब्ध करून दिल्या. तसेच दुषित पाणी (contaminated water) नष्ट करून टँकरने (water tanker) पाणी आणुन येथील नागरिकांना चांगले पाणी पुरवठा सुरू केला.

या ठिकाणी वैद्यकीय पथक सर्व नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु केले असुन गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. तारांगण पाडयात आता वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम तळ ठोकुन असुन सध्या येथील नागरिकांची परिस्थिती सुधारत असुन आता घाबरण्यासारखे काही नसुन मी रात्रभर या घटनेकडे गांभीर्याने लक्ष ठेवुन असणार आहे अशी माहिती यावेळी आमदार खोसकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com