उद्यापासून नाशिक विभागातून पंढरपूर ला बस जाणार नाही

हे आहे कारण
उद्यापासून नाशिक विभागातून पंढरपूर ला बस जाणार नाही
पंढरपूर

नाशिक | Nashik

आषाढी यात्रेसाठी (Ashadhi Ekadashi) भाविक पंंढरपुर (Pandharpur) मध्ये येऊ नये म्हणुन शनिवारी (दि.१७) पासुन २५ जुलै पर्यंंत पंढरपुरला जाणार्‍या बसेस बंद (Buses Closed) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे (Corona Crisis) यंदाही आषाढी यात्रा रद्द केली आहे. मोजक्याच पालख्या येऊ दिल्या जात आहेत, तरी सुध्दा काही भाविक (Devotees) पंंढंरपुरमध्ये येण्याची शक्यता असल्याने शनिवारी दुपारी दोन पासुन २५ जुलैला दुपारी चार पर्यंंत बसेसला परवानगी नाकारण्यात आली आहे.

त्यामुळे नाशिक विभागातील (Nashik Division) कोणत्याही आगारातुन उद्यापासुन पंंढरपुला बसेस जाणार नाहीत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com