दोन्ही पायाने दिव्यांग; तरीही पंढरी महाराज सहाणे देतायेत बालकांना मोफत वारकरी शिक्षण

दोन्ही पायाने दिव्यांग; तरीही पंढरी महाराज सहाणे देतायेत बालकांना मोफत वारकरी शिक्षण

बेलगाव कुऱ्हे | लक्ष्मण सोनवणे

अपंगाचा शाप उरावर घेऊन अनेक जन जन्माला येतात दुःखाचा डोंगर घेऊन काही व्यक्ती आत्महत्येला देखील कारणीभूत होताना दिसतात. मात्र, निसर्गाने जन्मताच दिलेले दोन्ही पायांच अपंगत्व मन पिळवटून टाकणारं असलं तरी त्याला समोरासमोर आव्हान देत इगतपुरी तालुक्यातील साकुर येथील पंढरीनाथ महाराज सहाणे यांनी वारकरी संप्रदायाची पताका आपल्या भक्कम कार्याने मजबूत केली आहे....

अनेकांची शरीर भर भक्कम असूनही त्यांच्याकडून कोणतेही काम होत नाही. मात्र, अपंग असूनही सहाणे महाराज हरिपाठ, गायन, वादन आदी मुलांना मोफत शिकवतात. आतापर्यंत त्यांनी चारशे पेक्षा जास्त मुलांना वारकरी शिक्षण देण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन अनेक संस्थानी पुरस्कार देखील दिले आहे.

लहान पणापासूनच दोन्ही पायाच्या अपंग पणावर मात करून हार न मानता त्यांचे गुरू वै. नागोराव बहाद्दूरे, निवृत्ती महाराज घोरवडकर यांच्याकडून अपंग असूनही वारकरी संप्रदायाचे शिक्षण आत्मसात केले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गेल्या ३० वर्षांपासून लहान लहान मुलांना वारकरी शिक्षण देऊन निष्काम सेवा करीत आहे. पिंपळगाव घाडगा, निनावी, भरविर बुद्रुक, टाकेद, धामणगाव, बेलू आदी गावांमध्ये सप्तहाचे आयोजन देखील सहाणे महाराज करतात.

आई वडिलांचे पूजन , गायन, वादन परमेश्वराचे चिंतन करीत या देहापासून जगाला काहीतरी फायदा व्हावा अशी ते इचछा व्यक्त करतात. मुलांवर योग्य संस्कार होण्यासाठी दरवर्षी उन्हाळी सुट्टीत बालसंकार शिबिराचे आयोजन देखील सहाणे महाराज करतात. अपंग असूनही त्र्यंबकेश्वर येथे सातत्याने वारी करतात. टाळ मृदुंगाच्या गजरात दररोज साकुर परिसर दुमदुमला जातो.

जन्मा येणे देवा हाती करणी जग हसवी या न्यायाने आपला जन्म कोणत्या काळात कसा होईल हे माहीत नाही. परमेश्वराने दिलेले अपंगाचे ओझे मनमोकळे स्वीकारून आत्मिक समाधानासाठी लहान मुलांना मोफत वारकरी शिक्षण देत आहे.

हभप पंढरीनाथ महाराज सहाणे, साकुर

Related Stories

No stories found.