हिरावाडीतील युवकाचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ

हिरावाडीतील युवकाचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ

पंचवटी | वार्ताहर

पंचवटीतील वाल्मिक नगर परिसरात शनिवारी(दि.१२) सकाळी एका युवकाचा संशयास्पद मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या युवकाचा घातपात झाला की नैसर्गिक मृत्य झाला या बाबत शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर उघड होईल अशी माहिती पंचवटी पोलिसांनी दिली आहे...

योगेश सोमनाथ भगत( वय.२५ रा.दामोदर नगर,हिरावाडी, पंचवटी) हा आज सकाळी वाल्मिक नगर परिसरात मयत अवस्थेत आढळून आल्याने परिसरातील नागरिकांनी पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती दिली. दरम्यान वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी योगेश भगत याचा मृतदेहाची तपासणी करीत शरीरावर काही मारहाणीच्या खुणा दिसतात का तसेच मृतदेहाजवळ काही संशयास्पद वस्तू आहे का याची खातरजमा केली.

त्याच प्रमाणे श्वान पथकास देखील पाचारण करण्यात आले होते. पोलिसांच्या पाहणीत प्रथम दर्शनी मयत योगेश भगत याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या नसल्या तर मग योगेशचा मृत्यू कश्यामूळे झाला यासाठी शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

योगेशचा मृतदेहाजवळच त्याची दुचाकी मिळून आली असून तो वाल्मिक नगर परिसरात कोणाकडे आणि कश्यासाठी आला होता या बाबत पंचवटी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com