नियम मोडणाऱ्या १८९५ जणांकडून १० लाख दंड वसूल
देशदूत न्यूज अपडेट

नियम मोडणाऱ्या १८९५ जणांकडून १० लाख दंड वसूल

कडक लॉकडाउन काळात पंचवटी पोलिसांची कारवाई

पंचवटी | Panchavti

लॉकडाउन काळात संचारबंदीसह शासकीय नियमांचे उल्लंघन करीत घराबाहेर अनावश्यक फिरणाऱ्या तब्बल १,८९५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत पंचवटी पोलिसांनी तब्बल १० लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

यात मास्कचा वापर न करणे, सोशल डिस्टन्सचे पालन न करणे, नियमित वेळेपेक्षा जास्त वेळ दुकाने खुली ठेवून सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या आस्थापनांवरही कारवाई करण्यात आली आहे.

करोनाचे वाढते संक्रमण पाहता राज्य शासनाने 'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू केले असतानादेखील या काळात काही बेजबाबदार नागरिक मोठ्या संख्येने विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे व संचारबंदी कायद्याचे उल्लंघन होत असल्याने पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे.

यावर पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी प्रामुख्याने गर्दीच्या ठिकाणी लक्ष केंद्रित केले आहे. यात दिंडोरी व पेठ रोडवरील भाजी बाजार परिसरात सातत्याने कारवाईचा धडाका लावला आहे.

यात विनामास्क फिरणारे १,०८९, सामायिक अंतर न पाळणारे १७५, बंद काळातही दुकान चालू ठेवणारे ३०, विनाकारण फिरणारे ५९० आणि ई पास नसताना रामकुंड परिसरात वावरणारे ११ अशा एकूण १,८९५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून आजपर्यंत एकूण दहा लाख बत्तीस हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

------------

पचवटीतील गोदाघाट, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, दिंडोरी रोड, पेठरोड, मखमलाबाद नाका आदी परिसरात अनावश्यक फिरणाऱ्या जवळपास ८०० ते ९०० नागरिकांची विभागीय कार्यालयातील मनपा कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कोरोना अँटिजेन चाचणी करण्यात आली. यात ३५ नागरिक पॉझिटिव्ह आढळले असून, त्याना अँबुलन्सने दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतमधील कोविड सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

---------------

सध्या जिल्हाभरात कडक लॉकडाउन सुरू आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. अत्यावश्यक कामाशिवाय कोणाही घराबाहेर पडू नये. १ जूनपर्यंत मोकाट फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व त्यांची कोरोना चाचणी सुरूच ठेवली जाणार आहे.

- अशोक भगत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पंचवटी पोलिस ठाणे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com