खून करून फरार झालेल्या संशयितास अवघ्या तीन तासांत अटक

पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कामगिरी
खून करून फरार झालेल्या संशयितास अवघ्या तीन तासांत अटक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जुन्या भांडणाची कुरापत काढून पंचवटी परिसरात (Panchvati Area) एका वीस वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून (Murder) करून पसार झालेल्या मारेकऱ्याला पंचवटी पोलिसांनी (Panchavati Police) अवघ्या तीन तासांत नवीन नाशकातील दत्त चौक परिसरातून (Dutt Chowk Area) सापळा रचून अटक (Arrested)केली...

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी (दि.१०) रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास रवी महादु शिंदे उर्फ रवी सलिम उर्फ पिंटु सैय्यद (Pintu Sayyed)(२०) (रा.गल्ली नं ३, मायको दवाखान्याचे मागे, कालिका नगर, पंचवटी, नाशिक) हा कालिकानगर येथून घरी पायी जात असतांना संशयित किरण रमेश कोकाटे (Kiran Ramesh Kokate) हा त्याच्या मागून रिक्षामधून आला. त्याने धारधार शस्त्राने रवी याच्यावर हल्ला केला. यामध्ये रवीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संशयित कोकाटे हा घटनास्थळावरून फरार झाला होता.

या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच विशेष पोलीस महानिरिक्षक, नाशिक परिक्षेत्र डॉ.बि.जी. शेखर पाटील (Dr. B.G. Shekhar Patil) उपायुक्त परिमंडळ १ अमोल तांबे (Amol Tambe) उपायुक्त गुन्हे संजय बारकुंड, सहाय्यक आयुक्त गंगाधर सोनवणे, पंचवटी पोलीस ठाण्याचे वपोनी डॉ. सिताराम कोल्हे, गुन्हे शाखा युनिट १ वपोनी विजय ढमाळ, मध्यवर्ती गुन्हे शाखा वपोनी आंचल मुदगल,पोलीस निरीक्षक युवराज पत्की, पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान, यावेळी संशयित कोकाटे याचा शोध घेण्यासाठी पंचवटी विभागातील पंचवटी, म्हसरूळ, आडगाव येथे गुन्हे शोध पथके (Crime Squads) रवाना केली. त्यानंतर संशयित कोकाटे बाबत पंचवटी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नवीन नाशकातील दत्त चौक परिसरातून सापळा रचत अटक केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com