पंचकल्याणक महोत्सवाची कचनेर येथे सांगता

पंचकल्याणक महोत्सवाची कचनेर येथे सांगता

उमराणे | वार्ताहर | Umrane

सकल दिगंबर जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर येथे आचार्य सौभाग्यसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत पंचकल्याणक महोत्सव पार पडला.

याप्रसंगी मुनिश्री शुभकिर्ती महाराज, मुनिश्री शुभबाहुबलीसागरजी महाराज, आर्यिका सौभाग्यमती माताजी, शुभमती माताजी, क्षुल्लक शुभमसागरजी महाराज, शुभलाभसागरजी महाराज, क्षुल्लिका शुभारंभमती माताजी, शुभाशिषमती माताजी, शुभामार्गमती माताजी यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

४६ वर्षानी हा पंचकल्याणक झाल्याबददल हजारो भाविकांनी यावेळी भगवंताचे दर्शन घेतले. या पंचकल्याणक महोत्सवात तप कल्याणकाच्या दिवशी भगवंत पार्श्श्वनाथाची पिच्छी आचार्य सौभाग्यसागरजी महाराज यांच्या हस्ते क्षेत्राचे सचिव विनोद लोहाडे व सुनिता लोहाडे यांना देण्यात आली.

मोक्षकल्याणक निमित्ताने पंचकल्याणक महोत्साची भव्य शोभायात्रेने सांगता करण्यात आली. तसेच भगवान मुनिसुव्रतनाथ, भगवान नेमीनाथ,भगवान शांतीनाथ, भगवान पदमप्रभु,भगवान चंद्रप्रभु,भगवान आदीनाथ,भगवान पुष्पदंत,भगवान वासुपुज्य यांची मूर्ती स्थापन करून पंचामृत अभिषेक व महाआरती करण्यात आली.

पंचकल्याणक महोत्सव यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक सुरेश कासलीवाल, विश्वस्थ ललीत पाटणी, संजय कासलीवाल, भरत ठोले, सुभाष बोहरा, अध्यक्ष वृषभ गंगवाल, उपाध्यक्ष हेमंत बाकलीवाल, सचिव विनोद लोहाडे, सहसचिव मुकेश कासलीवाल,महेंद्र ठोले, जितेंद्र पाटणी, अनुप पाटणी, नितीन गंगवाल, प्रकाश गंगवाल, राजेंद्र कासलीवाल मालेगांव, निलेश काला, महावीर ठोले, प्रविण लोहाडे, किरण मास्टर, नरेंद्र अजमेरा, पियुष कासलीवाल यांच्यासह विश्वस्थ व कार्यकारणी मंडळ परिश्रम घेतले. महामंत्री विनोद लोहाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास देशाच्या विविध भागातून जैन बांधव उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com