Video : गंगापूर रोडवर पडला प्लॅम्प्लेटसचा खच

Video : गंगापूर रोडवर पडला प्लॅम्प्लेटसचा खच

नाशिक| प्रतिनिधी

वेळ दुपारी दीड वाजेची. गंगाप्रूर रोडवरील डोंगरे वस्तीगृह परिसरातील रस्त्यावर एका खासगी कंपनीच्या प्लॅम्प्लेटसचा खच पडलेला दिसून आला. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार हे प्लॅम्प्लेटस वाटण्यासाठी आलेल्या दोन मित्रांमध्ये भांडण झाली आणि त्यांनी रागाच्या भरात स्वच्छ असलेल्या रस्त्यावर प्लॅम्प्लेटस फेकून दिले. दरम्यान महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत हा परिसर स्वच्छ केला.

रस्त्यावर खच पडल्याचे आढळून आल्यानंतर काही सुजाण नाशिककरांनी याबाबतची माहिती महापलिकेच्या स्वच्छता विभागाला दिली. यानंतर याठिकाणी स्वच्छता कर्मचारी दाखल होऊन त्यांनी रस्ता स्वच्छ केला.

यादरम्यान, एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले की, दोन मुले हे प्लॅम्प्लेट वाटत होते. त्यांच्यात काहीतरी बाचाबाची झाली. यानंतर रागाच्या भरात त्यांनी हे प्लॅम्प्लेटस फेकले. हवेमुळे ते रस्त्यासह परिसरात पसरले.

प्लॅम्प्लेटवर आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचे नाव आहे. तसेच संपर्क क्रमांकदेखील आहे. शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com