त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त त्र्यंबकेश्वरची पालखी मिरवणूक

त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त त्र्यंबकेश्वरची पालखी मिरवणूक

त्र्यंबकेश्वर। प्रतिनिधी Trimbakeshwar

त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त Tripuri full moon काढण्यात येणार्‍या रथमिरवणुकी Chariot procession ऐवजी यंदा ट्रस्टने पालखी मिरवणूक काढून त्र्यंबकेश्वरला Trimbakeshwar कुशावर्तात स्नान घडविले. या दरम्यान पावसाने हजेरी लावली.

दरवर्षीपेक्षा उशिराने पाच वाजेच्या सुमारास पाऊसाचे सावट असताना रथाची पूजा करण्यात आली रथाला त्र्यंबकेश्वराच्या सुवर्णमूर्तीचा पालखी स्पर्श करून पालखी मिरवण्यात आली.एका पालखीत त्र्यंबकेश्वर सोन्याचा तीन मुखी मुखवटा होता. तर दुसर्‍या पालखीत त्र्यंबकेश्वरचा चांदीचा एकमुखी मुखवटा पादुका होत्या.

करोनामुळे सलग दुसर्‍या वर्षी त्र्यंबकेश्वराचा रथ निघू शकला नाही. पालखी कुशावर्त तीर्थ त्रिपुरी पौर्णिमा उत्सवाच्या दिवशी पाऊस झाला.देवस्थानच्या विश्वस्तांनी रथ उत्सव प्रसंगी हजेरी लावून रथाचे पूजन केले.

त्रंंबकेश्वर मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दोन दिवस मंदिर रात्री नऊ वाजेपर्यंत खुले होते. नागरिकांंनी रस्त्यावर रांगोळ्या काढून मिरवणुकीचे स्वागत केले.पुष्पवृष्टी करण्यात आली.

विभागीय पोलीस अधिकारी कविता फडसरे पोलीस निरीक्षक रणदिवे व सहकारी चोख पोलिस बंदोबस्त ठेवून होते.त्र्यंबकेश्वर मंदिरात वाती लावण्यास मनाई होती. त्यामुळे कुशावर्त तीर्थावर वाती लावण्यास मोठी गर्दी महिलांनी केली होती.

8 अधिकार्‍यांसह 50 पोलीस बंदोबस्त तैनात होता.त्रंबकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष न्यायमूर्ती विकास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिपुरी पौर्णिमा उत्सव पार पडला. भाविकांनी मोठी गर्दी होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com