उत्कृष्ट सिंचन व्यवस्थापन करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी व पाणी वापर संस्थांचा गौरव

उत्कृष्ट सिंचन व्यवस्थापन करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी व पाणी वापर संस्थांचा गौरव

नाशिक | प्रतिनिधी

पालखेड पाटबंधारे विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे २०२३ यावर्षीचा सिंचननामा प्रकाशित करण्यात येऊन उत्कृष्ट सिंचन व्यवस्थापन करणाऱ्या अधिकारी - कर्मचारी व पाणी वापर संस्थांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

मेरीच्या इंजि. पा.कृ.नगरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमास विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी कार्यकारी संचालक राजेंद्र शुक्ला,लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक महेंद्र आमले,कार्यकारी अभियंते राजेश गोवर्धने,जितेंद्र पाटील, राघवेंद्र भाट व वैभव भागवत, वाघाड प्रकल्पस्तरीय संस्थेचे संचालक शहाजी सोमवंशी उपस्थित होते.

पालखेड पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी विभागाने वर्षभरात केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. त्यानंतर सिंचन नाम्याचे प्रकाशन होऊन,पालखेड पाटबंधारे विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी तसेच उत्कृष्ट सिंचन व्यवस्थापन करणाऱ्या पाणी वापर संस्थांना मान्यवरांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी कार्यकारी संचालक राजेंद्र शुक्ला यांनी पालखेड पाटबंधारे विभागातील वाघाड प्रकल्प, पालखेड प्रकल्प, ओझरखेड प्रकल्प ,यामध्ये पाणी वापर संस्था आणि शासन यामध्ये जे समन्वयाचे दर्शन घडते व त्यातून शेतकरी व शासन या दोघांनाही याचा फायदा होतो.

अशाच प्रकारे महाराष्ट्रातील इतरही सिंचन प्रकल्पांवरती पाणी वापर संस्था स्थापन होऊन त्यांच्यात व शासनामध्ये समन्वय घडल्यास सिंचन क्षेत्र व पाणी वापर याबाबत जागरूकता निर्माण होऊन शेतकरी व शासन दोघांच्याही उत्पन्नामध्ये भर पडणार आहे असा आशावाद व्यक्त केला.

शहाजी सोमवंशी यांनी अधिकाऱ्यांच्या गुणगौरवाबाबत गौरव उद्गार काढले. महिंद्र आमले यांनी देखील कार्याची प्रशंसा केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत गोवर्धने, पवार, निलेश वन्नेरे, विश्वास चौधरी, अभिजित रौंदळ, संभाजी पाटील, यांनी विशेष परिश्रम घेतले.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com