पालखेड बं. | Palkhed

गेल्या कित्येक वर्षापासून रस्त्याच्या कामापासून वंचित असणार्या दिंडोरी पालखेड बंधारा या रस्त्याच्या कामाला गेल्या दोन-तीन दिवसांपासून खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

मात्र हे खड्डे बुजवत असताना रस्त्याच्या साईटपट्ट्या तशाच सोडल्याने वाहनधारकांनी व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही महिन्यांपूर्वी या रस्त्यांचे काम करण्यात आले होते.

मात्र झालेल्या अवकाळी पावसाने या रस्त्यांची कामे कशी केली जाते हे सगळे पितळ अवकाळी पावसाने उघडे पाडले. कामाचा दर्जा कसा असतो हे पण दाखवून दिले. त्यामुळे या कामांची ची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिंडोरी - कोराटे रस्त्यावरही खडीचे गंज येऊन पडले आहे. मात्र अजूनही या रस्त्यांचे कामे सुरू करण्यात आलेली नाही दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वा च्या असणार्या या रस्त्यांवर मोठ-मोठी खड्डे पडली आहे.

पूर्णतः साईट पट्ट्या उखडून गेल्या आहे. मात्र अजूनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या रस्त्यांना वाली कोण अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. मात्र आता हे

रस्तेच आता कामांच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याने शालेय विद्यार्थ्यांच्या बसेस भाजीपाला वाहतूक द्राक्ष वाहतूक याशिवाय औद्योगिक वसाहत असल्याने अवजड वाहनांची वर्दळ नेहमी असते. तरीसुद्धा अजूनही या रस्त्यांच्या कामांकडे लक्ष नसल्याने ही कामे कधी होणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.