हरसूल-वाघेरा घाटात दरड कोसळली

हरसूल-वाघेरा घाटात दरड कोसळली

हरसूल | Harsul

गेल्या दोन दिवसापासून त्र्यंबक- हरसूल (Trimbak Harsul) परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून हरसूल वाघेरा घाटात (Harsul Vaghera Ghat) आज सकाळच्या सुमारास दरड (Landslide) कोसळली. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

गुजरातकडे जाण्यासाठी महत्वाचा मार्ग असलेला हरसूल वाघेरा घाट समजला जातो. प्रत्येक पावसाळ्यात या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडतात.

आजही सकाळच्या सुमारास दरड कोसळल्याने वाहतुक (Traffic Conjunction) काही काळ विस्कळीत झाली. यावेळी स्थानिकांनी ट्रॅक्टरच्या (Tractor) साहाय्याने दरड बाजूला करण्याचे काम सुरू होते.

दरम्यान दरवर्षी या ठिकाणी ददरडी कोसळतात. अनेकदा अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. यापूर्वीच देशदूत च्या माध्यमातून दरडी, कठडे ची दुरावस्था झाल्याची बातमी दिली होती. परंतु ये रे माझ्या मागल्या या उक्तीप्रमाणे येथील परिस्थिती जैसे थे आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com