पहिलवान देशमुखने पटकावली 'मानाची गदा'

पहिलवान देशमुखने पटकावली 'मानाची गदा'

मुंजवाड । वार्ताहर | Munjwad

देव मामलेदार यशवंतराव महाराज (Dev Maweledar Yashwantrao Maharaj) यांच्या यात्रोत्सवानिमित्त आयोजीत

कुस्तींच्या (wrestling) भव्य दंगलीत मानाची गदा व रोख 5 हजाराचे बक्षीस पाचोर्‍याचा पहिलवान प्रविण देशमुख याने इगतपुरीच्या (igatpuri) कुणाल पहिलवानास चितपट करत पटकावले. 65 वर्षाच्या वृध्द पहिलवानांसह मुलींच्या कुस्त्या (wrestling) या दंगलीचे विशेष आकर्षण ठरल्या होत्या.

देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदा कुस्त्यांच्या भव्य दंगलीचे आयोजन राजे शिवछत्रपती मित्रमंडळ, यशवंत तालीम संघ, मल्हार तालीम संघाने वस्ताद दगडू शिवदे, संजय कादरी, सतीष परदेशी यांच्या स्मरणार्थ केले होते. प्रारंभी सटाणा पोलीस ठाण्याचे (Satana Police Station) पो.नि. सुभाष अनुमुलवार यांच्या हस्ते बजरंगबलीच्या प्रतिमेचे पुजन करून श्रीफळ वाढवून कुस्ती दंगलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी आ. उमाजी बोरसे, ट्रष्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, ट्रस्टी रमेश देवरे, हेमंत सोनवणे, शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे, अनिल पाकळे, नुरा पहिलवान, शरद शेवाळे, अनिल पाकळे, दिलीप शेवरकर, गणेश पहिलवान, सुनिल खैरनार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी लहान गटात शंभू नंदाळे व शिव पाकळे या पहिलवानांमध्ये कुस्ती (wrestling) लावण्यात आली. त्यात शंभू पाकळे विजयी झाला. मुलींच्या लहान गटात मुंजवाडची शांभवी पाटील व कोटबेलची सायली खैरनार यांच्यात लढत झाली यात शांभवी पाटील हिने बाजी मारली. पहिल्या कुस्तीत हरलेली सायली खैरनार हिने खचून न जाता पुढील सर्व अकरा कुस्त्या जिंकून कुस्ती शौकीनांची मने जिंकली.

मोठया कुस्त्यांमध्ये अमळनेरचा प्रफुल्ल साळुंके व मालेगावचा (malegaon) अरबाज पहिलवान यांच्यात काट्याची कुस्ती झाली. यात अमळनेरचा पहिलवान विजयी झाला. दिनेश पिंपळसे याने लावलेली एकतीसशे रुपयांची कुस्ती तळवाडेचा बादल मोरे व कुणाल पटाईत यांच्यात झाली यात बादल मोरे विजयी झाला. मालेगावचा विजय यादव व धुळ्याचा अमोल माळी यांच्यात रंगलेला डाव प्रेक्षणीय होता यात विजय यादव विजयी ठरला. उडाण्याचा सुनिल अहिरे याने मालेगावच्या मुकेश पहिलवान याला चितपट करून बक्षिस जिंकले. सटाण्याचा सोमा पाकळे व नाशिकचा असलम काझी यांच्यात झालेल्या दंगलीत सोमा पाकळे याने विजय मिळवला.

शेवटची मानाची कुस्ती रंगतदार ठरेल असे कस्ती शौकीनांची अपेक्षा होती मात्र पाचोर्‍याचा पहिलवान प्रविण देशमुख याने इतगतपुरीचा कुणाल पहिलवान याला तिसर्‍या मिनिटात चितपट करून मानाची गदा मिळवली. पंच म्हणून रमेश देवरे, अनिल पाकळे, दीपक पाकळे, सौरभ सोनवणे, आबा नंदाळे, भैय्या सुर्यवंशी, गणेश पहिलवान, भैय्या सोनवणे, निलेश पाकळे उपस्थित होते. समालोचन दीपक नंदाळे व जिवन सोनवणे यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com