नांदगाव | Nandgoan

नांदगाव तालुक्यातील चिंच विहीर येथे कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यातून गोशाळातील कामगार अभिजित भडक यांच्या सतर्कतेने हरणाच्या पाडसाला जीवदान मिळाले.

नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर येथील गोशाळेजवळ एका हरणाने गोंडस अशा पिलाला जन्म दिला. या पिलावर भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. जवळच असलेल्या गोशाळेतील कामगार भडक यांनी सदर प्रकार बघितल्यानंतर क्षणाचा विलंब न करता कुत्र्यांच्या तावडीतून हरणाचे पाडसाला

वाचविले. यावेळी जखमी झालेल्या हरणाच्या पिलाची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय बोरसे यांनी देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नवनाथ ताठे यांनी उपचार करून सदर पिलाला वन विभागाचे वनपाल बाबासाहेब सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी सर्पमित्र गणेश देशमुख, विजय बडोदे, निखील पाटील, मेजर नानासाहेब काकळीज आदी उपस्थित होते.