ओझर-कसबे सुकेणेपर्यंत सिटीलिंक धावणार; असा असेल मार्ग

ओझर-कसबे सुकेणेपर्यंत सिटीलिंक धावणार; असा असेल मार्ग

कसबे सुकेणे | Kasabe Sukene

नाशिक महानगर परिवहन महामंडळाची सिटीलिंक शहर बस सेवा (Nashik City link Bus Service) ही नाशिक लगतच्या ओझर-सुकेणे (Ozar Sukene) पर्यंत विस्तारण्याची शक्यता आहे...

कसबे सुकेणे, थेरगाव, दात्याने, जिव्हाळे, दिक्षी, ओझर, ओझर टाऊनशिप या परिसरातून दररोज हजारो चाकरमानी प्रवासी विद्यार्थी व्यवसायिक शेतमजूर ये-जा करीत असतात. त्यामुळे सुकेणे-ओझर नाशिक मार्गावर राज्य परिवहन महामंडळाची (MSRTC) शहर बस सेवा यापूर्वी सुरू होती. ती नफ्यात होती.

एसटीची शहर बस सेवा बंद झाल्याने गेल्या काही दिवसापासून या मार्गावरील प्रवाशांची बस सेवा अभावी अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्यावतीने सुकेणेपर्यंत सिटी लिंकची सेवा दिली जावी, अशी मागणी कसबे सुकेणेच्या सरपंच गीता गोतरणे, उपसरपंच धनंजय भंडारे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष योगेश सगर, ॲड. बोरा, लक्ष्मण पडोळ यांच्यासह परिसरातील प्रवाशांनी केली होती.

दरम्यान शनिवारी सिटीलिंक च्या वतीने या मार्गावर सर्वे करून चाचणी घेण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. हे नवीन प्रयत्न यशस्वी व्हावेत, स्कूल व प्रवाशांची गैरसोय दूर होऊन पूर्वरत बस सेवा त्वरित सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

सध्या कसबे सुकेणे ते ओझर मार्गावर एकही बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.

नाशिक रोड कसबे सुकेणे व कसबे सुकेणे ते नाशिकरोड मार्गे ओझर टाऊनशिप, ओझर गाव, टिळक नगर, दहावा मैल, गरवारे ट्रक टर्मिनल, जुना जकात नाका, आडगाव, मेडिकल कॉलेज फाटा, जत्रा जंक्शन, बळी मंदिर, अमृतधाम, के के वाघ कॉलेज, औरंगाबाद नाका, निमानी, शालिमार, सीबीएस ते नाशिकरोड असा बस सेवेचा मार्ग असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com