ऑक्सिजन सिलेंडरची वाहतुक होणार निशुल्क
file photo

ऑक्सिजन सिलेंडरची वाहतुक होणार निशुल्क

सातपूर | प्रतिनिधी

कुठल्याही हॉस्पिटलमध्ये किंवा कोविड सेंटर अशा ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडरची वाहतूक करण्यासाठी वाहतुक व्यवस्था कमी पडत आहे. अशा पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने वाढत्या कोविड19 महामारीच्या संकटामुळे निशुल्क वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणतेही हॉस्पिटल कोविड सेंटर सामाजिक संस्था यांना ऑक्सिजन सिलेंडर वाहतूक करण्यासाठी अडचण येत असेल तर त्यांनी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसशी संपर्क करावा संघटनेतर्फे ऑक्सिजन सिलेंडर वाहतूक करण्यासाठी वाहने निशुल्क उपलब्ध करून दिले जातील असे सांगण्यात आले आहे.

ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या निर्णयाची माहिती मेलद्वारे जिल्हाधिकारी, विभागीय महसूल आयुक्त, नाशिक मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त यांना कळविण्यात आली आहे.

ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस कोणत्याही मदतीसाठी सदैव प्रशासनाबरोबर राहील असे आश्वासन अध्यक्ष सचिन जाधव, अंजु सिंघल, अवतारसिंग बिर्दी, अनिल कौशिक, विनायक वाघ, किरण भालेकर यांनी दिले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com