नाशकातील अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा; नातेवाईकांची धावपळ

नाशकातील अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा; नातेवाईकांची धावपळ

नाशिक | प्रतिनिधी

एकीकडे मनपाच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळतीने २४ निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागल्याची घटना नाशिकमध्ये ताजी असतानाच दुसरीकडे शहरातील सहा खाजगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याची माहिती समोर येत आहे. ऑक्सिजन तुटवडा असल्याचे सांगिलते जात असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी ऑक्सिजन मिळवण्यासाठी फोनाफोनी सुरु झाली आहे...

विशेष म्हणजे, ऑक्सिजन तुटवडयात नाशिकमधील मल्टीस्पेशालिटी असलेल्या बड्या रुग्णालयांचादेखील समावेश असल्याचे समोर येत आहे.

प्राप्त माहितीनुसार शहरातील एकूण सहा रुग्णालयांत आज दुपारपर्यंत पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा असल्याने अत्यवस्थ रुग्णांचे जीव टांगणीला लागले आहेत. त्यातच इतर हॉस्पिटलमध्येही ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने रुग्ण नेमके न्यायचे कुठे असा प्रश्न नातेवाईकांसमोर उपस्थित राहिला आहे.

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी खासगी हॉस्पिटलमधील ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत ठेवावा यासाठी सूचना केल्या होत्या. परंतु, याठिकाणी ऑक्सिजन तुटवडयामुळे नाशिक शहरात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऑक्सिजनचा तुटवडा

27 टन ऑक्सिजन दररोज माझ्याकडे येत होता. तिथून तो नाशिक शहरातील रुग्णालयांना पाठवला जात होता. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझ्याकडे १७ टन ऑक्सिजन येत आहे. त्यामुळे आपोआपच नाशिकमधील रुग्णालयांना पुरवठा कमी झाला आहे.

अमोल जाधव, ऑक्सिजन वितरक

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com