बिटको रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प सुरक्षेचा आढावा
USER

बिटको रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प सुरक्षेचा आढावा

नाशिकरोड । प्रतिनिधी

नाशिकमधील डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन वायूगळती दुर्घटनेत 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याने उडाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बिटको करोना रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्पाच्या सुरक्षेचा तातडीने आढावा घेण्यात आला.

बिटको रुग्णालयाच्या आवारात 20 हजार लिटर क्षमतेचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आहे. झाकीर हुसेन रुग्णालयात ज्या कंपनीने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारला त्याच कंपनीचा प्रकल्प बिटकोत आहे. सध्या बिटको रुग्णालयात 700 पेक्षा जास्त करोना रुग्ण असून त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

ऑक्सिजन बेडवर 425 रुग्ण आहेत. बिटकोतील ऑक्सिजन प्रकल्प दीड महिन्यापूर्वी सुरु झाला. येथे सुरक्षारक्षक असतात. पुण्याहून येथे ऑक्सिजनचा टँकर येतो. तीन दिवसांनी प्रकल्पात ऑक्सिजन भरला जातो. यावेळी मनपाचा अधिकारी हजर असतो. प्रकल्पात दोन टाक्या आहेत.

एका टाकीतून लिक्वीड ऑक्सिजनचा गॅस तयार होतो. लिक्विड ऑक्सिजन थंड असल्याने टाकीवर बर्फ साचतो. क्षमता टिकवण्यासाठी शॉवरने पाणी मारले जाते. प्रसंगी अग्निशमन दलाचा बंब बोलावून पाण्याचा नियमित मारा केला जातो. प्रकल्पात गळती होऊ नये म्हणून बिटकोत दक्षता घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com