इगतपुरी व हरसुल ग्रामीण रूग्णालयासाठी ऑक्सिजन प्लॅन्ट

आमदार खोसकर यांनी केला २ कोटीचा निधी मंजूर
इगतपुरी व हरसुल ग्रामीण रूग्णालयासाठी ऑक्सिजन प्लॅन्ट
File Photo

इगतपुरी । Igatpuri

आमदार हिरामण खोसकर यांनी इगतपुरी व हरसुलच्या कोविड सेंटरसाठी प्रत्येकी १ कोटी असा २ कोटी रूपयांचा निधी मंजुर केला. या निधीतुन ऑक्सीजन पुरवठा तेथे निर्माण केला जाणार असुन भविष्यात ऑक्सीजनचा तुटवडा भासणार नाही.

कोविडच्या पार्श्वभुमीवर मागील महिन्यात करोनाचे वाढत्या रूग्ण संख्येमुळे रुग्णांना अक्षरशः ऑक्सिजन बेड मिळत नव्हते. या गोष्टीचा सारासार विचार करून व दुरदृष्टि ठेवुन आमदार खोसकर यांनी हा निधी मंजूर केला आहे.

यामुळे ऑक्सीजन सिंलेडर बाहेरून मागवण्याची गरज भासणार नाही. इगतपुरी व हरसुल येथील कोविड सेंटर येथे लवकरच ऑक्सीजन प्लॅन्टची निर्मिती होणार असुन ग्रामीण भागातील गरीब गरजु रूग्णांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे. आमदार खोसकर यांनी या बाबत सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजुर केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com