नाशकात लवकरच 'ऑक्सिजन ऑन व्हील्स' उपक्रम

काय आहे ही संकल्पना
नाशकात लवकरच 'ऑक्सिजन ऑन व्हील्स' उपक्रम

नाशिक | Nashik

महिंद्रा अँड महिंद्रा व महिंद्रा लॉजीस्टिक्स च्या माध्यमातून ऑक्सिजन ऑन व्हील्स हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. लवकरच या उपक्रमाची सुरवात नाशकात होणार आहे.

यामध्ये जम्बो सिलेंडर द्वारा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. हॉस्पिटल टू सप्लायर व सप्लायर टू हॉस्पिटल अशी सेवा मोफत सेवा पुरवण्यात येणार आहे. सकाळी अकरा ते रात्री अकरा अशी ही सेवा नाशकात उपलब्ध असणार आहे. यासाठी गंगापूर रोड, द्वारका, पंचवटी, मुंबई नाका, जुने सिडको, नाशिकरोड, नवीन सिडको व सातपूर या भागात समन्वयक नेमण्यात आले आहे.

काय आहे संकल्पना?

महिंद्रा कंपनीने आपल्या बोलेरो पिकअप ट्रकद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्सिजन सिलेंडरचा सप्लाय करेल. कंपनी आपल्या 70 बोलेरो ट्रकद्वारे ऑक्सिजन सिलेंडर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवला जाईल. ही सुविधा मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूरमध्ये पुढील २४ तासांत सुरू केली जाईल असं सांगण्यात आलं आहे. यानुसार नाशकात लवकरच सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

कसं काम करेल ऑक्सिजन ऑन व्हिल्स -

'ऑक्सिजन ऑन व्हिल्स' हा उपक्रम सुरळितपणे चालवण्यासाठी एक कंट्रोल रुम बनवण्यात आली आहे. याशिवाय कंपनीने ऑक्सिजन सिलेंडर ठेवण्यासाठी गोदामही तयार केलं आहे, जेथे जवळच्या ऑक्सिजन प्लाँटमधून रिकामा ऑक्सिजन सिलेंडर पुन्हा वापरण्यासाठी रिफिल केला जाईल.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com