नगरसेविका समीना मेमनकडून ऑक्सिजन मशीन उपलब्ध

नगरसेविका समीना मेमनकडून ऑक्सिजन मशीन उपलब्ध

संपर्क करण्याचे आवाहन

जुने नाशिक | Nashik

ऑक्सिजनच्या तुटवडा लक्षात घेऊन तसेच विविध शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता लक्षात घेऊन अनेक रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार होत आहे.

अशा वेळी त्यांना ऑक्सिजनची गरज भासते. म्हणून येथील प्रभाग क्रमांक 14 च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका समीना मेमन यांनी ऑक्सीजन मशीनच मोफत उपलब्ध करून दिल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

शहरातील विविध भागातून तसेच प्रभागातून लोक सतत संपर्क करून उपचारासाठी रुग्णांना दवाखान्यात जागा मिळून द्यावी, असे आग्रह होतो. शक्य होईल तीतक्या लोकांना आपण मदद करतो मात्र तरी अनेकांना बेड मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही. म्हणून जे लोक घरी उपचार करीत आहे, त्यांच्यासाठी आम्ही चार ऑक्सिजन मशिनच खरेदी करून त्या लोकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. अशी माहिती नगरसेविका मेमन यांनी दिली.

सर्वधर्मियांसाठी ते मोफत उपलब्ध करून दिल्याने समाधान व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे त्यांनी सोशल मीडिया वर विशेष फोन नंबर उपलब्ध करून ज्यांना गरज आहे. त्यांनी ती मशीन घरी मागून घ्यावी व उपचार झाल्यावर परत द्यावी, असे आवाहन केल्याने त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. होम आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांसाठी ४ ऑक्सिजन मशीन उपलब्ध झाल्यामुळे बऱ्यापैकी रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना त्याचा फायदा होताना दिसत आहे.

कोणाला हे ऑक्सीजन मशीन हवी असल्यास त्यांनी ह्या क्रमांकावर फोन करावे असे आवाहन करण्यात आले आहेत. नगरसेविका समिना मेमन 8830875850, सामाजिक कार्यकर्ते हाजी शोएब मेमन 9823209186 व ओवेझ मेमन 70201 14547.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com