नाशकातील 'या' संघटना उभारणार ऑक्सीजन जनरेशन प्लांट
USER

नाशकातील 'या' संघटना उभारणार ऑक्सीजन जनरेशन प्लांट

नाशिककरांच्या मदतीची गरज

सातपूर । Satpur

शहरात निर्माण झालेल्या ऑक्सिजन तुटवड्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सामाजिक भावनेने प्रेरित तीन संघटना पुढे आल्या असून, त्यांच्या माध्यमातून नाशिकमध्ये हवेतील ऑक्सिजन गोळा करणारे ऑक्सीजन जनरेशन प्लांट उभारण्यासाठी निधी जमा करण्याचे मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या चार ते पाच दिवसात हा प्लांट उभारलाा जाणार आहे

Title Name
नाशिकनंतर दुसरी मोठी दुर्घटना : विरार रुग्णालयास आग: १३ जणांचा मृत्यू
नाशकातील 'या' संघटना उभारणार ऑक्सीजन जनरेशन प्लांट

नवभारत विकास परिषद नाशिक, आयटी असोसिएशन व सीओईपी माजी विद्यार्थी संघटना नाशिक, यांच्या संयुक्त विद्यमाने सध्याच्या सरकारी हॉस्पिटल मधील ऑक्सिजनची टंचाई दूर करण्याकरता नाशिक महानगरपालिकेच्या हॉस्पिटल मध्ये ऑक्सीजन प्लांट उभारुन देण्याचे नियोजित आहे.

एअरसेप, एअरॉक्स कंपनीच्या एएस- एफ ऑक्सिजन जनरेटर प्लांट ची किंमत उत्पादनाच्या प्रमाणात अंदाजे ४२ व ६० लाख अशा आहेत. तरी वरील प्रकल्पाला मदत करण्यासाठी नवभारत विकास फाउंडेशन पुणे या नावाने देणगी देण्याचे आवाहन करण्यात आले.

या देणगीला एटी जी सर्टिफिकेट लागू राहणार आहे. हा प्रकल्प आपल्याला येत्या आठवड्यात कार्यान्वित करायचा आहे. ही यंत्रणा उभारण्यासाठी 60 लाखांची गरज असून, त्यासाठी विविध संघटना वेगाने पुढे येत असून निधी उभारण्याच्या कामाला गती मिळाली आहे

सुमारे 60 लाख रूपये खर्चातून उभारल्या जाणाऱ्या ऑक्सिजन निर्मिती कारखान्यात प्रति दिन 50 सिलेंडर तयार होणार आहेत शहरातील वाढती गरज लक्षात घेता आपला वाटा त्यात देण्याच्यादृष्टीने संघटनेचे सभासद मोठ्या उत्साहाने पुढे येत आहेत संकल्पनेच्या पहिल्याच दिवशी 30 ते 35 लाख रुपये जमा झाले आहेत.

प्लांट उभारायला ४-५ दिवस लागणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या 2-3 दिवसात सर्वांनी देणगी जमा करण्याचे आवाहन प्रकल्प संयोजक अशोक कटारिया,उमेश राठी, अरविंद महापात्रा, प्रशांत पाटील, अरविंद कुलकर्णी, अमर ठाकरे, ऋषिकेश वाकदकर, नदीम शेख, विजय बाविस्कर,कैलास पाटील आदींनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com