कळवणला ऑक्सिजन जनरेशन प्लांट मंजूर

महिनाभरात ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित होणार
कळवणला ऑक्सिजन जनरेशन प्लांट मंजूर

कळवण । प्रतिनिधी

कळवण उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी 50 बेडचे ऑक्सिजन कोविड सेंटर मंजूर करण्यात आले असून त्यात 15 व्हेंटिलेटर बेडचा समावेश आहे. 50 बेडच्या या कोविड सेंटरमध्ये वायरलेस आरोग्य तपासणी यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात ही यंत्रणा प्रथमच कळवण उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये राबविण्यात येत असल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली.

उपजिल्हा रुग्णालयातील 50 बेडच्या कोविड सेंटरचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तत्काळ कामे पूर्ण करून दोन दिवसांत सेंटर कार्यान्वित करून रुग्णांना दिलासा देण्याच्या सूचना आमदार पवार यांनी दिली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना, तहसीलदार बी. ए. कापसे आदी उपस्थित होते.

आमदार पवार यांनी सांगितले की, करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयांत कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट मंजूर झाला आहे. त्याची निविदा काढण्यात आली आहे.

महिनाभरात ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित होणार आहे. यावेळी गोपाळखडी येथील कोविड केअर सेंटरला आमदार पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी मीना, तहसीलदार कापसे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद परदेशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील, डॉ. प्रल्हाद चव्हाण, डॉ. दीपक बहिरम, डॉ. पराग पगार, डॉ. विलास चव्हाण, डॉ. बंगाळ आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com