इगतपुरी कोविड सेंटरला ऑक्सिजन जनरेशन प्लांट मंजुर

आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रयत्नांना यश
इगतपुरी कोविड सेंटरला ऑक्सिजन जनरेशन प्लांट मंजुर
USER

इगतपुरी । Igatpuri

आमदार खोसकर यांच्या पाठपुराव्याला यश आले असुन इगतपुरी ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला कायमस्वरुपी ऑक्सीजन प्लांट मंजुर करण्यात आला आहे. इगतपुरी ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटर येथे लवकरच ऑक्सीजन जनरेशन प्लांट सुरु होणार असुन इतर आवश्यक वैद्यकीय साहित्याचाही लवकरच पुरवठा करणार असल्याची माहिती आमदार हिरामण खोसकर यांनी दिली आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामूळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याकारणाने आरोग्य यंत्रणेवर खुप ताण पडत आहे. असंख्य रुग्णांचे नातेवाईक आपल्या रूग्णाला ऑक्सीजन बेड मिळावा व लवकर बरा व्हावा यासाठी नातेवाईक उपचारासाठी धडपड करत आहे.

ही बाब बघता अनेक कोविड सेंटरमध्ये ऑक्सीजन, रुग्णवाहिका, रेमडिसीवर इंजेक्शन अश्या अनेक गोष्टीची कमतरता भासत आहे. ही बाब लक्षात घेत इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, तालुक्याचे आमदार हिरामण खोसकर यांनी नाशिकचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्याकडे इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सीजन जनेरशन प्लांट मिळावा याबाबत मागणी धरून ठेवत पाठपुरावा सुरु ठेवला होता.

या ऑक्सीजन प्लांटमुळे कोरोना रुग्णांना उपचारासाठी दिलासा मिळणार असल्यामुळे आमदार खोसकर यांचे तालुका वासीयांनी आभार मानले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com