गुड न्यूज ! 'ऑक्सिजन एक्सप्रेस' थोड्याच वेळात पोहचणार नाशिकला

गुड न्यूज ! 'ऑक्सिजन एक्सप्रेस' थोड्याच वेळात पोहचणार नाशिकला

नाशिक | Nashik

रात्री नागपुरात दाखल झालेली ऑक्सिजन एक्सप्रेस थोड्याच वेळात नाशिक रोड रेल्वे स्थानकावर दाखल होणार आहे.

दरम्यान विशाखापट्टणम स्टील प्लॅट सायडींगमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या 7 (एलएमओ) टँकर्ससह रो-रो सेवेद्वारे ऑक्सिजन एक्सप्रेस काल सायंकाळी, 8.10 वाजता महाराष्ट्रातील नागपूर स्थानकात दाखल झाली.

नागपूर स्थानकात 3 टँकर उतरविण्यात येणार असून उर्वरित टँकर नाशिक रोड स्थानकात उतरविण्यात येणार आहेत. ऑक्सिजन एक्सप्रेस थोड्याच वेळात नाशिक रोड स्थानकात पोहोचेल.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो आहे. अशावेळी रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेत रेल्वेद्वारे अन्य राज्यांमधून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नाशिकच्या घटनेनंतर सध्या शहरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नाशिकला येणारा ऑक्सिजन नवसंजीवनी देणारा ठरणारा आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com