नाशकात 'ऑक्सिजन बॅक' पुरवणार ऑक्सिजन करेक्टर मशीन

नाशकात 'ऑक्सिजन बॅक' पुरवणार ऑक्सिजन करेक्टर मशीन

बालगणेश फाऊंडेशनचा उपक्रम : आयुक्तांकडून स्वागत

नाशिक । Nashik

करोना रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड मिळणे ही मोठी समस्या ठरत असून त्यावर तोडगा म्हणून शिवसेना माजी महानगरप्रमुख तथा नगरसेवक अजय बोरस्ते यांच्या बालगणेश फाऊंडेशनने 'ऑक्सिजन बॅक' ही संकल्पना सुरु केली असून गरजू रुग्णांना घरापर्यंत आॅक्सिजन करेक्टर मशीन उपलब्ध करुन दिले जात आहे.

Title Name
कोरोना रुग्णांसाठी रिलायन्सने उचलले हे मोठे पाऊल
नाशकात 'ऑक्सिजन बॅक' पुरवणार ऑक्सिजन करेक्टर मशीन

त्यामुळे रुग्णाची ऑक्सिजन बेडसाठी होणारी धावपळ कमी होत असून या संकल्पनेचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी देखील कौतुक केले आहे. तसेच महापालिका स्तरावर हे माॅडेल राबविण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

करोना संसर्ग‍चा उद्रेक झाला असून गुणाकाराने रुग्णसंख्या वाढत आहे. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण असून ऑक्सिजन बेड मिळवणे अशक्यप्राय बाब ठरत आहे. त्यावर पर्यायी व्यवस्था म्हणून ऑक्सिजन बॅक ही संकल्पना पुढे आली.

मुंबईमध्ये ऑक्सिजन बॅक ही संकल्पना सुरु असून त्यानंतर नाशिकमध्ये हा प्रयोग राबविण्यात येत आहे. बोरस्ते यांनी २० मशीन मुंबई येथून मागवल्या असून त्याची किंमत प्रत्येकी एक ते दोन लाखांच्या घरात आहे. ही मशीन हवेतील आॅक्सिजन खेचून घेऊन त्याचा रुग्णाला पुरवठा करते. वाफेच्या मशिनसारखे हे ऑक्सिजन मशीन काम करते.

रुग्ण फारच गंभीर स्थितीत असेल व त्यास ऑक्सिजनची गरज असेल तर हे मशीन जीवनदायनी ठरत आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ कमी होऊन आॅक्सिजन बेडची पर्यायी व्यवस्था करण्यास त्यांना वेळ मिळतो. सध्या सर्व ऑक्सिजन मशीन बुक असून शंभर ते दीडशे वेटिंग आहे.

मशीन कसे बुक करु शकता

बालगणेश फाउंडेशनने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करुन हे मशीन बुक करत‍ा येईल. अनेकजण गरज लागेल म्हणून विनाकारण अगोदरच मशीनसाठी बुकींग करत आहेत. काहीजण मोफत असल्यामुळे स्वत: जवळच ठेवतात. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी मशीनसाठी दिवसाला शंभर रुपये भाडे आकारले जात आहे. तसेच मशीनसाठी यापुढे डिपाॅजीट देखील आकारले जाणार आहे.

आयुक्तांकडून माॅडेलचे कौतुक

आयुक्त जाधव यांनी या आॅक्सिजन बॅकचे कौतुक केले असून शहरात हा पॅटर्न राबविण्याचा विचार करत आहेत.

बोरस्ते यांनी त्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला नगरसेवक निधीतून पाच लाख देण्याची मागणी केली आहे. जेणेकरुन प्रत्येक नगरसेवक हे आॅक्सिजन मशीन खरेदी करुन त्यांच्या प्रभागात गरजू रुग्णांना ते उपलब्ध करुन देऊ शकतो.

आयुक्तांनी ऑक्सिजन बॅकची दखल घेतली असून शहरात हा पॅटर्न राबिण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी हे मशीन उपयोगी ठरत आहे. आॅक्सिजन बेड नाही मिळाला तरी तीन ते चार दिवस हे मशीन वापरुन रुग्ण गरज भागवू शकतो. शहरातील नगरसेवक, रोटरी, लायन्स व विविध सामाजिक संस्थांनी आॅक्सिजन बॅकसाठी पुढाकार घेतल्यास नक्कीच आरोग्य व्यवस्थेवरील ताण हलका होईल.

- अजय बोरस्ते, माजी महानगर प्रमुख. शिवसेना

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com