नाशिककरांना मशिदींकडून मिळणार ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशिन

शरीयत बचाव कमिटीचा उपक्रम
नाशिककरांना मशिदींकडून मिळणार  ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशिन

जुने नाशिक । Nashik

होम आयेसोलेट होणार्‍या रुग्णांसाठी शहरातील शरीयत बचाव कमिटीकडून नाशिककरांसाठी ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशिन उपलब्ध करुन दिले आहेत.

भद्रकाली पोलीस ठाणे जवळ असलेल्या शाही मशिदींतून ही मशिन रुग्णांना मोफत मिळणार आहे. सर्वधर्मीय लोकांनी मशिनचा लाभ घ्यावा, असे आवाहन शरीयत बचाव कमिटीचे अध्यक्ष तथा खतीब ए नाशिक हाजी हाफिज हिसामोद्दीन अशरफी यांनी केले आहे.

फातेहा पठण करत या मशिनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी हाजी सलिम पटेल, फैज बँक अध्यक्ष आसिफ शेख, नदीम शेख, जहीर शेख, माजी नगरसेवक हाजी निजाम कोकणी, हाजी युनुस, हाजी ग्यास, नसिर मनियार उपस्थित होते. करोना नष्ट होण्यासाठी विशेष दुआ करण्यात आली.

शाही मशिदींतून सकाळी ११ ते दुपारी ०१ व सायंकाळी ०५ ते ०७ यावेळेत ही मशिन रुग्णांना मिळणार आहे. ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशिन रुग्णांना देण्यासाठी कमिटीकडून समन्वयकाची नेमणूक करण्यात आलेली असून शाज मन्सुरी यांना 8482878092 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com