देवळा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेडची सुविधा

सोमवारपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार - : आ. डॉ. आहेर
देवळा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेडची सुविधा

देवळा । प्रतिनिधी

देवळा ग्रामीण रुग्णालयात सोमवार (दि.26)पासून 30 अद्ययावत ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आ. डॉ. राहुल आहेर यांनी दिली.

येथे ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असते अशा रुग्णांना सध्या उमराणे ग्रामीण रुग्णालय तसेच चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागत होते. देवळा येथे ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत होते.

त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे यांच्या समवेत देवळा ग्रामीण रुग्णालय येथे आ. डॉ. आहेर यांनी भेट दिली व तत्काळ ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात यावेत, अशा सूचना संबंधितांना दिल्या.

त्यानुसार सोमवारपासून देवळा ग्रामीण रुग्णालयात 30 अद्ययावत बेड उपलब्ध होणार असल्याने गंभीर करोना रुग्णांना जागेवर उपचार मिळणार असल्याचे आ. डॉ. आहेर यांनी यावेळी सांगितले.

आ. डॉ. आहेर यांच्या प्रयत्नातून देवळा ग्रामीण रुग्णालयात 30 ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी संभाजी आहेर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश कांबळे उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com