आरोग्य सेवकांमुळे करोनावर मात- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

निफाड येथे प्राणवायू प्रकल्प उद्घाटन
आरोग्य सेवकांमुळे करोनावर मात-  केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

निफाड। प्रतिनिधी Niphad

आरोग्य विभागाचे कर्मचार्‍यांनी health workers रात्रीचा दिवस केला म्हणून आपण करोनाला Corona हरवू शकलो. आज सर्व ठिकाणी व्हॅक्सीन पोहचविण्याला प्राधान्य दिले जात आहे.

34 जिल्ह्यात 68 पी.एम प्लॅन्ट देण्यात आले. महाराष्ट्रासाठी 4500 व्हेंटीलेटर उपलब्ध करून दिले. मात्र असे असले तरी करोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे मास्क शिवाय घराबाहेर पडू नका. केंद्र सरकारच्या माध्यमातून जी मदत लागेल ती करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar यांनी केले आहे.निफाड उपजिल्हा रुग्णालयात प्राणवायू प्रकल्पाचे Oxygen plant उद्घाटन ना. भारती पवार यांचे हस्ते घटस्थापनेच्या मुहूर्तावर करण्यात आले. त्याप्रसंगी पवार बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, प्रांत डॉ.अर्चना पठारे, आमदार दिलीप बनकर, तहसीलदार शरद घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत खैरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रोहन मोरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र डोखळे, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.सुनील राठोर उपस्थित होते.

मंत्री डॉ. पवार म्हणाल्या की, निफाडमध्ये खुप चांगले काम चालू आहे. तसेच निफाडकरांनी आपले वेगळेपण सिद्ध करून दाखविले आहे. आमदार दिलीप बनकरांनी रस्त्यांचा प्रश्न मांडला. साहजिकच हा प्रश्न देखील मार्गी लावू. तालुक्यात अद्यापही करोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे. तसेच शक्यतो मास्कशिवाय घराबाहेर पडू नका. केंद्राच्या वतीने आज सर्व ठिकाणी व्हॅक्सीन पोहचविण्याला प्राधान्य दिले जात आहे. भविष्यात तालुक्याला जी काही मदत लागेल ती करण्यास मी कटीबद्ध आहे असे प्रतिपादन ना. पवार यांनी केले.

यावेळी आमदार दिलीप बनकर यांनी वीज, रस्ते, पाणी आदी समस्यांवर प्रकाशझोत टाकत केंद्राने त्यासाठी मदत करावी असे प्रतिपादन केले. यावेळी जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, राजेंद्र डोखळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

निफाड ग्रामस्थ व उपजिल्हा रुग्णालयाचे वतीने ना. भारती पवार यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रुग्ण कल्याण समितीचे मधूकर शेलार, महेश चोरडीया, भाजप जिल्हा अध्यक्ष केदा आहेर, बाजार समिती सभापति सुवर्णा जगताप, भागवत बोरस्ते, शिवाजी ढेपले, वैकुंठ पाटील, यतीन कदम, शंकर वाघ, संजय गाजरे, लक्ष्मण निकम,

सुनील निकाळे, संजय वाबळे, सुरेखा कुशारे, नामदेव शिंदे, आदेश सानप, बापू पाटील, संजय शिंदे, सचिन धारराव, सारिका डेर्ले, सुनील मोरे आदींसह उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.सुनील राठोर, सतिश पोटे, डॉ.कृष्णा यादव, डॉ.अमृता कट्यारे, आरोग्य सेविका एस.पी. फणसे, मंगला जाधव, अधिपरिचारिका नयना कुमावत, उज्वला जाधव, विशाल विसे, कोल्हे, करपे, चकोर, पराग, चव्हाण, नितिन परदेशी, आरिफ पटेल, वैभव बागूल, आर.बी. चव्हाणके, ऋषिकेश सानप आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com