नाशिकमध्ये आजही वाढले अडीच हजारपेक्षा अधिक रुग्ण; दोन दगावले

नाशिकमध्ये आजही वाढले अडीच हजारपेक्षा अधिक रुग्ण; दोन दगावले

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरासह जिल्ह्यात तिसऱ्या लाटेने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पंधरा दिवसांपूर्वी दोन अंकी असलेली बाधितांची संख्या आता चार अंकांवर पोहोचली आहे. दुसरीकडे दिलासादायक बाब अशी की, जशी लाट अचानक वाढली आहे तशाच्या संख्येने करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जे नुकसान झाले ते या लाटेमध्ये दिसून येत नाही...

आज दिवसभरात नाशिक जिल्ह्यात २ हजार ५८९ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १ हजार ३७९ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली.

आज वाढलेल्या रुग्णांमध्ये नाशिक मनपा क्षेत्रातील १ हजार ५७६ समावेश आहे. तर नाशिक ग्रामीणमधीलही आज रुग्णसंख्या वाढलेली असून आज ग्रामीण भागात ८८१ नवे रुग्ण बाधित आढळले आहेत.

मालेगाव मनपामध्येही रुग्ण आता वाढण्यास सुरुवात झाली असून आज दिवसाखेर ३४ रुग्ण बाधित आढळले आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्यादेखील वाढलेली असून जिल्हाबाह्य रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज दिवसाखेर जिल्हाबाह्य ९८ रुग्ण बाधित आढळले आहेत.

नाशिक मनपा क्षेत्रात आज दोन रुग्णांचा करोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ८ हजार ७७२ वर पोहोचली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com