दिलासादायक : तीन हजार पेक्षा अधिक रुग्णांची दिवसभरात करोनावर मात

दिलासादायक : तीन हजार पेक्षा अधिक रुग्णांची दिवसभरात करोनावर मात

नाशिक | Nashik प्रतिनिधी

लॉकडाऊनची अंमलबजावणी नाशिक शहरात केल्यानंतर गेल्या ३-४ दिवसांपासून रुग्णसंख्येत कमालीची घट बघावयास मिळत आहे. दिवसेंदिवस घटत असलेल्या रुग्णसंख्येमुळे मोठा दिलासा मिळाला आहे...

आज नाशिक जिल्ह्यात एकूण ३ हजार १८२ रुग्णांनी करोनावर (Covid 19) मात केली. तर जिल्हाभरात एकूण १ हजार ८५१ रुग्ण नव्याने बाधित आढळून आले आहेत.

यामध्ये नाशिक मनपा (Nashik Municipal corporation) क्षेत्रात ८८२ तर नाशिक ग्रामीण 911 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर मालेगाव मनपा क्षेत्रात ५८ रुग्ण बाधित आढळले आहेत.

नाशिक जिल्यात आतापर्यंत ४ हजार ७० रुग्णांनी करोनामुळे प्राण गमावले आहेत. आज नाशिक शहरातील ११ तर ग्रामीण भागातील १९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com