नाशकात ६ हजार १०४ रुग्ण करोनामुक्त
करोनामुक्त

नाशकात ६ हजार १०४ रुग्ण करोनामुक्त

३ हजार ४१२ करोनाबाधित आढळले; ३८ दगावले

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात आज ६ हजार १०४ रुग्णांनी करोनावर मात केली. तर ३ हजार ४१२ रुग्ण करोना बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आज ३८ रुग्ण करोना संसर्गाने दगावले आहेत.

आज बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये नाशिक मनपा क्षेत्रात १ हजर ८२६ रुग्ण वाढले. तर नाशिक ग्रामीणमध्ये १ हजार ५०३ रुग्ण वाढले. मालेगाव मनपा क्षेत्रात आज ३४ रुग्णांची भर पडली तर जिल्हाबाह्य ४९ रुग्णांची संख्या वाढली.

जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ५३५ करोना रुग्णांचा करोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. यामध्ये आजच्या ३८ रुग्णांचादेखील समावेश आहे.

आज झालेल्या मृतांमध्ये नाशिक महापालिकेच्या हद्दीतील ११, मालेगाव महापालिका हद्दीतील ०६, नाशिक ग्रामीणमधील २१ रुग्णांचा समावेश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com