ई-पिक पाहणी नोंदणीत 3 हजार 619 शेतकर्‍यांचा सहभाग

दिंडोरीत शासनाचा पथदर्शी प्रकल्प
ई-पिक पाहणी नोंदणीत 3 हजार 619 शेतकर्‍यांचा सहभाग

दिंडोरी | प्रतिनिधी

करोनाच्या पार्श्‍वभुमीवर यंदाच्या खरीप हंगामात दिंडोरी तालुक्यात ई-पिक पाहणी अ‍ॅप नोंदणीत 3 हजार 619 शेतकर्‍यांनी सहभाग नोंदवला आहे. सुमारे 4362 हेक्टर क्षेत्राची नोंदणी झाली असल्याची माहिती प्रांत डॉ. संदिप आहेर यांनी दिली.

ई-पिक नोंदणीत आता दिंडोरी तालूक्याने आघाडी घेतल्याचे दिसुन येत असुन 3 हजार 619 शेतकर्‍यांचा सहभाग ही बाब उल्लेखनीय मानली जात आहे. त्यांमुळे शेतकरीही आता अ‍ॅपचा वापर करु लागल्याचे स्पष्ट होत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागातही होत चालला आहे. त्यामुळे शासकिय कार्यालयांप्रमाणे शेतावर काम करणार्‍या महसुल आणि कृषी विभागाच्या यंत्रणेलाही शेतकर्‍यांनी ई-पिक पाहणी अ‍ॅप नोंदणी दिंडोेरी तालूक्यात करावी यासाठी प्रशासनाने एक ते दोन महिन्यापासुन कंबर कसली होती.

महाराष्ट्र राज्यात इ पिक पहाणीचा पथदर्शी प्रकल्प एकुण 9 तालूक्यात राबवण्यात येत आहे. नाशिक विभागातुन दिंडोरी तालूक्याची निवड झालेली आहे. दिंडोरी तालूक्यात हा प्रकल्प फेब्रुवारी 2019 पासुन राबवण्यात येत आहे.

तालूक्यात एकुण 67064 खातेदारांपैकी 56426 खातेदारांची आतापर्यत प्राथमिक नोंदणी झालेली आहे. चालू वर्षाच्या खरीप हंगामातील पिक पहाणीला सुरुवात झालेली आहे. या वर्षीच्या संपुर्ण खरीप हंगामातील संपुर्ण पिक पाहणी ही फक्‍त मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातुन केली जाणार असल्याने सर्व शेतकर्‍यांनी आपल्या पिकाची नोंदणी स्वत: करणे आवश्यक आहे.

चालू वर्षीची कोव्हिड स्थिती लक्षात घेता अधिकारी कर्मचारी तसेच शेतकर्‍यांना प्रशिक्षण व जनजागृती करण्यासाठी व्हीडीओ कान्फरस माध्यमांचा वापर करण्यात येत आला. तालूक्यातील सर्व तलाठी व कृषी सहायक तसेच जिल्हा व तालूका स्तरावरील अधिकारी कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण व्हीडीैओ कान्फरसच्या माध्यमातुन नुकतेच पार पडले.

या प्रकल्पाचे मुख्य मार्गदर्शक जयत कुमार बांंठीया,प्रकल्प सल्लागार संभाजी पाटील,राज्य समन्वयक इ फेर फार जमाबंदी आयुक्‍त रामदास जगताप यांनी मार्गदर्शन केले. दिंडोरी तालूक्याचे इ पिक पहाणीचे कामकाजाचे सुक्ष्म नियोजन करण्यासाठी मागील आठवण्यात विभागीय उपायुक्‍त दिलीप स्वामी, उन्मेष मंहाजन यांनी दिंडोरी तहसिल कार्यालयात सभा घेतली होती.

सभेत प्रांत संदिप आहेर, तहसिलदार कैलास पवार, जिल्हा समन्वयक बी.डी.पाटील आदी उपस्थित होेते.

सर्व अधिकारी,कर्मचारी यांनी परिश्रम शेतकर्‍यांपर्यत इ पिक पहाणी, नोंदणी अ‍ॅप पोहचवले.

त्यामुळेच 30 जुलै 2020 अखेर दिंडोरी तालूक्यात 3619 शेतकर्‍यांनी इ पिक पहाणी अ‍ॅप वापरले व 4362 हेक्टर क्षेत्रावरील पिकाची नोंदणी मोबाईल अ‍ॅप मार्फत केली. आता 15 ऑगस्ट पर्यत इ पिक पहाणीचा पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com