गेल्या दहा दिवसांत १२ हजार ५०० ने घटली रुग्णसंख्या; सद्यस्थितीत 'इतक्या' रुग्णांवर उपचार सुरु

गेल्या दहा दिवसांत १२ हजार ५०० ने घटली रुग्णसंख्या; सद्यस्थितीत 'इतक्या' रुग्णांवर उपचार सुरु

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात दहा दिवसांपूर्वी ४८ हजार ५०० रुग्णांवर उपचार सुरु होते. मात्र, गेल्या दहा दिवसांत करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा मोठा वाढला असून साडेबारा हजारांनी रुग्णसंख्या घटली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३६ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत...

तसेच लॉकडाऊनमुळे शहरासह ग्रामीण भागातील रुग्णसंख्यादेखील कमी झाली आहे. नाशिक ग्रामीण २ हजार ७८९, चांदवड १ हजार २०, सिन्नर २ हजार १२५, दिंडोरी १ हजार ८०, निफाड २ हजार ३८५, देवळा १ हजार १५, नांदगांव ५४९, येवला ६६६, त्र्यंबकेश्वर २७८, सुरगाणा ४४६, पेठ १४७, कळवण ६६६, बागलाण १ हजार ३४७, इगतपुरी ४०२, मालेगांव ग्रामीण ८०६ असे एकूण १५ हजार ७२१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहेत.

तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १८ हजार ४१८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६१७ तर जिल्ह्याबाहेरील २५५ असे एकूण ३६ हजार ०११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८५.४६ टक्के, नाशिक शहरात ८९.९० टक्के, मालेगाव मध्ये ८३.८७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.३० टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८८.१३ इतके आहे.

शहरात आतापर्यंत ३ हजार ६०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक ग्रामीण १ हजार ६८१ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ५६९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २५२ व जिल्हा बाहेरील ९८ रुग्णांचा समावेश आहे.

२६ एप्रिल रोजीची आकडेवारी

नाशिक १ हजार ६९०, चांदवड १ हजार ८३२, सिन्नर २ हजार ९१, दिंडोरी १ हजार ५२२, निफाड ३ हजार ७७८, देवळा १ हजार २१७, नांदगांव ९३१, येवला ७९०, त्र्यंबकेश्वर ५०९, सुरगाणा ३७७, पेठ १६८, कळवण ८९७, बागलाण १ हजार ५९८, इगतपुरी ४६८, मालेगांव ग्रामीण ७८७ असे एकूण १८ हजार ६५५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार होते. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २७ हजार ७९७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ८३६ तर जिल्ह्याबाहेरील २८३ असे एकूण ४८ हजार ५७१ रुग्णांवर उपचार सुरुहोते. आता ही आकडेवारी जवळपास साडेबारा हजार रुग्णांनी घटली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com