करोनाबरोबरच डेंग्यूचा प्रादुर्भाव

ऑगस्टच्या २ आठवड्यात १३ रुग्ण
करोनाबरोबरच डेंग्यूचा प्रादुर्भाव

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहराला करोना साथीचा विळखा बसत असतांना आता नागरिकांना डेंग्युच्या साथीला सामोरे जावे लागत आहे. पावसाळा सुरू होण्यापुर्वी महापालिकेकडुन डेंग्युचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी केल्या जाणार्‍या उपाय योजना व जनजागृती मोहीम करोनामुळे घेता आली नाही.

केवळ करोनावर महापालिकेने लक्ष केंद्रीत झालेले असतांना आता शहरात डेंग्युने वर डोके काढले असुन ऑगस्ट महिन्याच्या चौदा दिवसात 13 रुग्ण आढळून आले आहे. यामुळे आता नाशिककरांना करोना साथीबरोबरच पावसाळ्यातील साथीच्या आजारांना सामोरे जावे लागणार आहे.

नाशिक महापालिकेकडुन पावसाळा सुरु झाल्यानंतर डेंग्यु साथीच्या आजारासंदर्भात जनजागृती व घरात, परिसरात साठणार्‍या पाण्यातील एडिस नावाच्या डासाची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्याची मोहीम घेतली जाते. यंदा मात्र करोनाच्या संकटामुळे महापालिका प्रशासन करोना प्रादुर्भाव रोकण्यासाठीच्या कामात व्यस्त आहे.

करोनाचा वाढता संसर्गामुळे महापालिका सार्वजनिक आरोग्य व वैद्यकिय विभागाकडुन आता डेंग्यु साथीकडे लक्ष घातले आहे. यात नागरिकांनी देखील आपल्या घरात फ्रिजमागील भागातील पाण्यात, झाडांच्या कुंड्या, खराब टायर, नारळ्याच्या कवट्या, गच्चीवरील भंगारातील भांडी, पाणी साठविण्याचे भांडे व घराच्या आवतीभोवती साठणार्‍या पाण्याच्या साठ्यात एडीस डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी काळजी घ्यावीत असे आवाहन महापालिकेकडुन करण्यात आले आहे.

मागील वर्षात ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यत शहरात 117 डेंग्यु पॉझिटीव्ह आढळले होते. यात 1 जानेवारी ते 30 जुन 2019 पर्यत केवळ 12 डेंग्यु रुग्ण होते. नंतर पावसाळ्यात रुग्ण वाढत जाऊन जुलै ते 31 ऑगस्ट 2019 पर्यत एकुण 117 डेंग्यु रुग्ण शहरात सापडले होते. तर चालु वर्षात 1 जानेवारी ते 14 ऑगस्ट पर्यत एकुण 101 रुग्ण शहरात आढळले आहे.

यात ऑगस्ट महिन्याच्या 14 दिवसात 13 डेंग्यु रुग्ण आढळले आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यत डेंग्युचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने याकडे महापालिकेला लक्ष द्यावे लागणार आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com