कोविड रुग्णांसाठी आरक्षित पैकी 2005 खाटा शिल्लक

कोविड रुग्णांसाठी आरक्षित पैकी 2005 खाटा शिल्लक
कोविड रुग्णांसाठी आरक्षित पैकी 2005 खाटा शिल्लक

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशिक महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांचे वाढत असलेले संक्रमण पाहता सप्टेंबर महिन्याच्या 6 दिवसांत कोविड रुग्णांचा आकडा 4 हजार 802 पर्यंत गेला आहे. अशाप्रकारे प्रतिदिन सरासरी 700 रुग्णांची भर पडत असून शहरातील रुग्णांचा आकडा 30 हजारावर पोहोचला आहे.

वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेत मनपा प्रशासनाकडून आता कोविड रुग्णांसाठी सात हजारावर खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. आजमितीस शहरात 68 रुग्णालयात महापालिकेकडून 3 हजार 577 खाटा आरक्षित असून यापैकी 2005 खाटा शिल्लक आहे.

यामुळे कोविड रुग्णांसाठी शहरात कोणतीही कमरता नसल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शहरात जून महिन्यात शेवटी प्रतिदिन 150 रुग्ण वाढल्यानंतर जुलैत हा आकडा 200 च्यावर गेला होता. आता ऑगस्ट महिन्यात प्रतिदिन सरासरी 500 करोनाबाधित रुग्ण समोर आले होते. आता सप्टेंबर महिन्यात सहा दिवसात प्रतिदिन 700 इतके नवीन रुग्ण समोर येत आहे.

बाधित रुग्णांच्या संंपर्कात आलेले त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडून पुरेशी काळजी घेतली जात नाही. तसेच मास्क न वापरण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. परिणामी करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यातच महापालिकेने आरटीपीसीआर व अँटिजेन चाचणी तीन हजारांपर्यंत नेल्यामुळे नवीन रुग्ण तत्काळ समोर येत आहे.

वाढत्या रुग्णांमुळे महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील संशयितांवर उपचारासाठी महापालिकेकडून सरकारी व खासगी कोविड केअर सेंटर व रुग्णालयामध्ये 7 हजारांवर खाटा उपलब्ध करून दिल्या आहे.

यातील ठक्कर डोम कोविड सेंटरमधील 280 खाटा रिक्त आहे. यामुळे एकीकडे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे महापालिकेकडून रुग्णांना तत्काळ खाटा उपलब्ध करून देण्यासाठी मोठी यंत्रणा कार्यरत केली असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.

रुग्णांचा खासगी रुग्णालयात जाण्यावर भर

शहरात करोना संसर्ग वाढत असल्याने महापालिकेकडून कोविड रुग्णालय व केअर सेंटरमध्ये चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र याठिकाणी केवळ सर्वसामान्य व गरीब कुटुंबांतील रुग्ण उपचार घेत आहे.

याठिकाणी चांगल्या सुविधा नसल्याचे प्रचार मोठ्या प्रमाणात झाल्याने बहुतांशी रुग्ण हे खासगी रुग्णालयात दाखल होत आहे. तेव्हा सरकारी रुग्णालयात चांगली सेवा - सुविधा उपलब्ध आहे, हे पटवून देण्यात महापालिका कमी पडत आहे.

शहरातील 68 रुग्णालयातील कोविड रुग्ण खाटा स्थिती

मनपा आरक्षित खाटा वापरात खाटा शिल्लक खाटा

3577 1572 2005

ऑक्सिजन 805 524 281

आयसीयु 347 259 88

व्हेंटिलेटर 114 96 18

जनरल 2213 596 1617

मनपा व खासगी रुग्णालयातील खाटांची स्थिती

रुग्णालय खाटा क्षमता वापरातील खाटा शिल्लक खाटा

समाज कल्याण 500 219 281

बिटको 350 149 201

नवीन बिटको 190 000 190

मेरी वसतिगृह 200 80 120

ठक्कर डोम 280 00 280

ज्युपिटर 100 000 100

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com