जिल्ह्यात १ हजार ८०० विद्यार्थी शाळाबाह्य; मनपा हद्दीतील ५५० जणांचा समावेश

जिल्ह्यात १ हजार ८०० विद्यार्थी शाळाबाह्य; मनपा हद्दीतील ५५० जणांचा समावेश
file photo

नाशिक | प्रतिनिधी

शिक्षण हक्क कायदा अमलात आणला जात असला तरी एका सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यामध्ये सहा ते १४ वयोगटातील १८६७ विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर गेले आहे. शालाबाह्य मुलांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी नाशिक महानगरपालिका हद्दीतील असून त्यांची संख्या ५५६ नोंदविण्यात आली आहे...

लॉकडाउनमुळे या विद्यार्थ्यांचे स्थलांतरण झाल्याचा अंदाज असून विद्यार्थी ज्या भागात गेले असतील तेथे शैक्षणिक प्रवेश घेतला तर ठीक अन्यथा शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती आहे.

गेल्या महिन्यात शालाबाह्य मुलांचे सर्वेक्षण शिक्षण विभागाकडून करण्यात आले. त्यामध्ये १८६७ मुले शालाबाह्य असल्याची बाब समोर आली आहे. लॉकडाउनपूर्वी कडक संचारबंदी लागू करण्यात आली होती. लॉकडाउन होण्याच्या शक्यतेने व रोजगाराला संधी नसल्याने मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले.

त्यामुळे शालाबाह्य मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे. मागील वर्षी हजेरी पटावर असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला. त्यानुसार शालाबाह्य विद्यार्थ्यांची आकडेवारी समोर आली आहे.

सहा ते चौदा वयोगटातील कधीच शाळेत न गेलेले ८५७ तर शालाबाह्य १०१०, असे एकूण १८६७ विद्यार्थी आढळून आले आहेत. नाशिक व मालेगाव महापालिका हद्दीमध्ये शालाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. लॉकडाउनमुळे अनेकांचा रोजगार गेल्याने स्थलांतर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिक महापालिका हद्दीमध्ये ५५६ तर मालेगाव महापालिका हद्दीमध्ये २८२ विद्यार्थी शालाबाह्य आढळले. नाशिक तालुक्यात १५९ ही सर्वाधिक संख्या आहे.

तालुकानिहाय शालाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या

तालुका शालाबाह्य मुले

महापालिका नाशिक ५५६
निफाड ६५
पेठ २०
सिन्नर ०९
सुरगाणा ४९७
त्र्यंबकेश्‍वर ०६
येवला ४४

बागलाण ४३

चांदवड ७२

देवळा ०४

दिंडोरी १३

इगतपुरी ४१

कळवण ३४

मालेगाव ०३

नांदगाव २०

नाशिक १५९

मालेगाव महापालिका २८१

एकूण १८६७

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com