‘त्या’ लाभार्थ्यांना आता ओटीपी

‘त्या’ लाभार्थ्यांना आता ओटीपी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

रेशनचे धान्य वितरणात पारदर्शकता यावी, यासाठी शासनाने ऑनलाईन वितरणाची व्यवस्था सुरु केली असून बायोमेट्रीक्सद्वारेच धान्य वितरीत केले जात आहे. मात्र, अनेक लाभार्थ्यांच्या बोटांचे ठसेच मशीनवर उमटत असल्यामुळे यामध्ये अजून एक सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार आता लाभार्थ्यांच्या आधारलिंक असलेल्या मोबाईलवर 6 अंकी ओटीपी पाठविला जाईल, त्यांतर तो अद्ययावत झाला की तत्काळ धान्याचे यशस्वी वितरण करता येणार आहे.

बायोमेट्रीक्सवद्वारे धान्याचे वितरण न करणार्‍या दुकानदारांबाबत वारंवार तक्रारी होत आहेत. त्यावर जिल्हा पुरवठा विभागाकडून वारंवार ताशेरे ओढले जात असल्याने आता त्यावर वरील नवीन पर्याय अन्न नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांनी दिला आहे. रेशनचे धान्य वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने ऑनलाईन वितरणाची व्यवस्था सुरु केली. त्यातही बायोमेट्रीक्सद्वारेच धान्य वितरीत केले जात आहे.

परंतु, अनेक लाभार्थ्यांच्या बोटांचे ठसेच मशीनवर उमटत नाही. त्यामुळे त्यांना धान्य देताना अडचण येते. असे धान्य ऑफलाईन दिल्याचे सिस्टमवर अद्ययावत करावे लागते. अनेकदा लाभार्थी धान्यापासून वंचीतही राहातात. पण त्याची नोंद होत नसून ऑफलाईन धान्य दिल्याचे दुकानदारांकडून दाखविले जाते. या संशयास्पद प्रकारावर आळा घालण्यासाठी पुरवठा विभागाने लाभार्थ्यांच्या मोबाईलवर ओटीपी देण्याचा महत्वाचे निर्णय घेतला आहे.

याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग, वित्त विभागाचे उपसचिव भगवान घाडगे यांच्याशी राज्यातील रेशन दुकानदारांच्या संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी अडी-अडचणींंबाबात चर्चा केली. यावेळी मोफत धान्य वाटपाचे पैसे ऑगस्ट 2023 पासून थेट दुकानदारांच्या खात्यावर जमा केले जातील. राज्यात एकूण 56 हजार दुकानदार असून त्यापैकी 35 हजार दुकानदारांनी बँक खाते दिले.

तितक्याच दुकानदारांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार असल्याचे स्पष्ट करताना इतरांनी त्वरीत द्यावे, असेही त्यांनी सूचित केले. वितरणात येणारी तुट बाबतच्या तरतुदीचा पुरावा मिळाला असून, त्याचे रेकॉर्ड गोदाम मॅन्युअलमध्ये असल्याचेही यावेळी दुकानदारांकडून सांगण्यात आले. यावेळी राज्यअध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील, जनरल सेक्रेटरी बाबुराव महमाने, राजु रीकामे, अरुण बागडे , हरीश गुप्ता आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com