...अन्यथा अत्यावश्यक सेवेची वाहतूक देखील बंद करू
अत्यावश्यक सेवा रस्त्यावर

...अन्यथा अत्यावश्यक सेवेची वाहतूक देखील बंद करू

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमध्ये सुरू करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या ट्रान्सपोर्ट कार्यालयात काम करणाऱ्या चालकांना व कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्या-येण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी त्यांना होणारी मारझोड थांबवावी अन्यथा अत्यावश्यक सुविधांची वाहतूक बंद करावी लागेल असा इशारा नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच अध्यक्ष राजेंद्र फड यानी पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे व पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे...

त्यांनी दिलेल्या निवेदनात, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यशासन तसेच जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन केले आहे.मात्र अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाला आपण या कालावधीत सेवा बाजावण्यास परवानगी दिलेली आहे.

मात्र ट्रान्सपोर्ट कार्यलयात काम करणारा प्रतिनिधी तसेच चालकांना आपल्या घरापासून कार्यालयात ये जा करण्यासाठी परवानगी नसल्यास त्यांना ये जा करणे कठीण होत आहे. त्यामुळे कामकाज करणे अवघड होत आहे. तसेच परवानगी काढण्यासाठी कुठलीही व्यवस्था अद्याप करण्यात आलेली नसल्याचे म्हटले आहे.

आज लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी ट्रान्सपोर्ट व्यवसायाला परवानगी असतांना देखील चालकांना व कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी विचारपूस न करताच मारझोड केल्याच्या तक्रारी ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांकडून प्राप्त झालेल्या आहे. अत्यावश्यक सेवेत काम करत असतांना देखील मारझोड होत असेल तर ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अत्यावश्यक मालाची देखील वाहतूक बंद करतील.त्यासाठी आपल्या स्तरावरून स्पष्ट आदेश देण्यात येऊन परवानगी देण्यात यावी. कार्यालयाच्या ओळख पत्रावर त्यांना कामकाज करण्यास परवानगी देण्यात अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना कागदपत्रे दाखविल्यानंतर देखील मारझोड केली जात असेल तर ही बाब निषेधार्थ आहे. यावर प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन त्याबाबत स्पष्ट आदेश काढण्यात येऊन सूचना देण्यात यावे. अन्यथा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक देखील बंद करतील असा इशारा राजेंद्र फड यांनी निवेदनातून दिला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com