दुध दरवाढ आंदोलन
दुध दरवाढ आंदोलन
नाशिक

दुधाला भाव दया...अन्यथा लॉकडाऊन गेले खडयात !

- स्वाभीमानी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष

Gokul Pawar

Gokul Pawar

दिंडोरी । Dindori

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात दूध बंद आंदोलन राज्यभर सकाळपासुनच सुरू झाले आहे. आज सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी चिंचखेड येथील प्राचीन शिवमंदीरात दुग्ध अभिषेक करुन सरकारला चांगली सुबुध्दी येवू दे अशी मागणी केली.

दरम्यान दिंडोरी शहरात दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी यांनी शहरात आंदोलन करीत पाण्याच्या बाटली पेक्षा दुधाचा भाव कमी झाला, यामुळे दुधाला तात्काळ ५ रुपये अनुदान मिळावे या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करीत असल्याचे सांगितले. तसेच राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध विक्री बंद ठेऊन आपला आवाज बुलंदपणे शासना पर्यंत पोहचवला आहे. करोना विषाणूचा प्रार्दुभाव लक्षात घेता लाक्षणीक आंदोलन असून सरकारने आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले तर लॉकडाऊन गेले खड्यात आम्ही सर्व स्वाभीमान संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला आहे.

ते पुढे म्हणाले कि, केंद्र शासनाने मागील महीन्यात १० हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय त्वरीत रद्द करावा. ३० हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा, तसेच निर्यात अनुदान प्रति किलो ३० रूपये देण्यात यावे.दूध पावडर, तूप, बटर व इतर दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी पूर्णपणे रद्द करावा.पुढील तीन महिन्यासाठी राज्य सरकारने थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर प्रतिलिटर ५ रूपये अनुदान जमा करावे. या प्रमुख मागण्या केंद्र व राज्य शासनाकडे करण्यात आल्या आहे. हे आंदोलन एका दिवसाचे असून सकाळी ग्रामदेवतेला दूध अभिषेक करून शासनाला सुबुद्धी देण्याची प्रार्थना गावागावात केली जाणार आहे. तसेच त्या दिवसाचे दूध प्रत्येक गावात गोरगरिबांना,गरजूंना मोफत वाटले जाणार आहे. महाराष्ट्रातील अनेक मोठया दूध संघांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे, असे जगताप यांनी सांगितले

लॉकडाऊनमुळे अनेक दूध संघ शेतकऱ्यांना दुधाला १८ ते २० रुपये भाव देत आहेत. यातून उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. त्यामुळे राज्यभरातील दूध उत्पादक त्रस्त आहे. दुधाची विक्री कमी झाली.म्हणून दूध उत्पादकांना शासनाने आधार देण्याची गरज आहे. यासाठी हे आंदोलन होत आहे. शासनाने लक्ष न दिल्यास लक डाऊनचे नियम तोडून पूर्वीप्रमाणे आक्रमकपणे स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल.

- संदीप जगतापप्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Deshdoot
www.deshdoot.com