...अन्यथा रात्री आठपर्यंत हॉटेल्स सुरु ठेवू; नाशिकच्या हॉटेल व्यावसायिकांचा मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम

...अन्यथा रात्री आठपर्यंत हॉटेल्स सुरु ठेवू; नाशिकच्या हॉटेल व्यावसायिकांचा मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरात लागू असलेल्या निर्बंधातून इतर व्यवसायांना सायंकाळी आठ वाजेपर्यंतची मुभा देण्यात आली आहे. मात्र, हॉटेल व्यावसायिकांना सायंकाळी चार वाजेपर्यंत आणि शनिवार रविवार पूर्णपणे बंद असे निर्बंध ठेवण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिकांनी आज आंदोलन केले. यावेळी मुखमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी १० तारखेचा अल्टिमेटम दिला आहे....(Agitation against hotel timing)

१० तारखेपर्यंत हॉटेल व्यावसायिकांचे निर्बंध शिथिल करण्याबाबत जर निर्णय घेतला नाही तर इतर व्यवसायिकांप्रमाणेच ८ वाजेपर्यंत हॉटेल्स (Nashik Hotels) सुरु राहतील असा इशारा देण्यात आला आहे.

करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावाची पार्श्वभूमीवर शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. बाधितांची संख्या कमी कमी होत असताना हे निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहेत. नुकतेच राज्य शासनाने शिथिल केलेल्या आस्थापनांमध्ये रेस्टॉरंट व्यवसायिकांबाबत आपण दुजाभाव केल्याचे स्पष्ट जाणवत असल्याचे रेस्टॉरंट व्यवसायिकांनी सांगितले आहे. (Restaurant Owners)

निवेदनात म्हटल्यानुसार, मुळात रेस्टॉरंट हा व्यवसाय सायंकाळच्या वेळेवर अवलंबून असणारा व्यवसाय आहे. मात्र, दुपारी ४ वाजेनंतर मुक्तपणे व्यवसाय करण्यास मुभा मिळालेली नाही. भाडे (Rent of the Hotel) , माणसांचा पगार(Salary of workers), लाईट बिल (Light Bill) आदी खर्च असल्याने रेस्टॉरंट व्यावसायिक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

त्यामुळे स्वतःचा उदरनिर्वाह करणे देखील जिकरीचे झाले आहे. कोव्हिडच्या नियमाचे पालन करण्यास तयार असल्याने आमच्या व्यवसाय करण्याच्या वेळेविषयी घेलेल्या निर्णयावर पुनर्विचार करून रात्री १० पर्यंतची वेळ वाढवून द्यावी, अशी विनंती करण्यात आलेली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com